निळेमोरे येथे मलनिस्सारण केंद्र
वसई-विरार पालिकेच्या आरक्षणात बदल
विरार, ता. २ (बातमीदार) ः वसई-विरार उपप्रदेशाच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये फेरबदल करण्यात आला आहे. त्यानुसार निळेमोरे येथे प्रस्तावित पाणीसाठवण तलावाऐवजी आता मलनिस्सारण केंद्र उभारले जाणार आहे.
वसई-विरार शहरातील पूरस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या संस्थांची मिळून सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती. या समितीच्या अहवालानुसार शहरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी, तसेच पावसाचे पडणारे पाणी शहरात साठून राहू नये, यासाठी धारण तलाव विकसित करण्याची सूचना करण्यात आली होती. यासाठी नालासोपारा पश्चिमेतील निळेमोरे येथील जागा आरक्षित केली होती; मात्र वाढत्या शहरीकरणाने सांडपाणी व्यवस्थापनासाठी बदल महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच परिसरातील सांडपाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठीच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.