मुंबई

पनवेलमधील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

CD

पनवेल, ता. २ (बातमीदार) : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षामध्ये सोमवारी (ता. २) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत नागरी सेवा सुविधा विभाग व इतर विभागाचे पाच अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला परिवहन विभाग व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त मंगला माळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे, प्रभाग अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादवाढीसाठी महापालिकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी आपले वैयक्तिक अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे पंधरा दिवस आधी द्यावेत. संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनादिवशी उपस्थित राहावे, असे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेकिंगला जाते सांगून लोणावळ्याला गेली; मुंबईत LLB करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा ४०० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

Pune News: पुणे बनणार संरक्षण अर्थकारणाचे संशोधन हब: जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, सांगवीत ‘एनएडीएफएम’च्या संकुलाची उभारणी!

Latest Marathi News Live Update : भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Pune News: टायगर पॉइंट दरीत आढळला तरुणीचा मृतदेह; नवी मुंबईच्या श्रेया पती यांचा मृत्यू, लोणावळ्यात नेमकं काय घडलं!

Ajit Pawar Plane Crash : विमान अपघातानंतर अजित पवार यांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे पटली; पोलिस सुत्रांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT