मुंबई

पेण मध्ये खोटा खरेदीखत केल्यामुळे प्रदीप वर्तक, दत्तात्रेय दांडेकर यांना अटक

CD

खोटे खरेदीखत करणे भोवले
पेणमध्ये दोघांना अटक

पेण, ता. ३ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जमिनीचा २०१२ मध्ये ७० ब नुसार दावा सुरू असतानासुद्धा खोटे सातबारा जोडून खरेदीखत केल्याबाबतची तक्रार पेण पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी येथील प्रदीप वर्तक आणि दत्तात्रेय दांडेकर या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील मौजे पाटणोली येथील शेतीविषयी दावा सुरू असताना वामन रामचंद्र माडये यांनी २०१२ मध्ये जमीन खरेदी केली. ही जमीन खरेदी करण्यासाठी व दुरुस्ती खत करण्यासाठी जोडण्यात आलेल्या शेतकरी दाखल्यासाठी मौजे सापोली येथील मिळकती दाखले जोडले. मौजे सापोली येथील युनुस खान यांची मिळकत अमोल कामत आणि वामन माडये यांना प्रदीप वर्तक व दत्तात्रेय दांडेकर यांनी मध्यस्थ म्हणून २०११ मध्ये खरेदी करून दिली. त्यावेळी या मिळकतीच्या दस्ताला शेतकरी दाखला म्हणून अमोल कामत यांच्या नावे मौजे दासगाव तालुका महाड भुमापन क १३०अ/३ चा, तसेच वामन रामचंद्र माडये यांच्या नावे मौजे पाणसई तालुका माणगाव येथील भुमापन क १९८/६ हे खोटे सातबारा जोडून मध्यस्थ राहून खरेदीखत करून दिल्याची फिर्याद सूर्यकांत पाटील यांनी दिली होती. त्यानुसार यामधील प्रदिप वर्तक व दत्तात्रय दांडेकर यांना पेण पोलिसांनी अटक केली.
याबाबत आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम नवरखडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT