विकास महाविद्यालयात ५११ बाटल्या रक्तसंकलन
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) : विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचलित विकास कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, विक्रोळी (पूर्व) येथे राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) युनिटच्या वतीने दिवंगत कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ५११ बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विकास राऊत यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय वैद्यकीय संघटनेचे सचिव डॉ. संकेत दोशी, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. हरीश पांचाळ उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सामाजिक बांधिलकी आणि रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
या शिबिरात संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावे, यासाठी महानगरपालिकेच्या शताब्दी रुग्णालयाची रक्तपेढी, संकल्प रक्तपेढी यांच्यासह अन्य प्रमुख रक्तपेढ्यांनी तांत्रिक सहकार्य केले. या उपक्रमाला स्थानिक माजी नगरसेवक उपेंद्र सावंत तसेच मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. संस्थेचे सचिव डॉ. विनय राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनघा राऊत, वैष्णवी राऊत, महाविद्यालयाच्या प्राचार्या सी. विन्स, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संभाजी इंगळे, प्रा. विनायक मुळे, उपप्राचार्य प्रा. शाजी मॅथ्यू यांनी या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ माहिती केंद्र यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.