मुंबई

रोह्यात पहाटेच्यावेळी प्रचंड प्रमाणावर धुके.

CD

धुक्यामुळे अपघाताचा धोका
सुतारवाडी-पुणे रस्त्यावर वाहनचालकांची कसरत
रोहा, ता. २ (बातमीदार) ः यंदा हवामानात निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत असून, फेब्रुवारीतही कमालीचा गारवा जाणवत आहे. विशेषतः सुतारवाडी आणि परिसरात पहाटेपासूनच दाट धुक्याचे साम्राज्य पसरत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
फेब्रुवारी महिना उजाडला तरी हवामानात मोठ्या प्रमाणात गारवा आहे. पहाटे ५ वाजल्यापासून परिसरात धुक्याची चादर पसरत असून, सकाळी ९ वाजेपर्यंत हे धुके ओसरत नाही. या दाट धुक्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दृश्यमानता कमी झाल्यामुळे भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सकाळी कंपनीमध्ये जाणाऱ्या कामगारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहेत.
सुतारवाडी ते पुणे हे अंतर केवळ १०० किलोमीटर असल्याने या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ असते. विले-भागाड एमआयडीसी परिसरात मोठ्या कंपन्या असल्याने अवजड कॉईल घेऊन जाणारे मोठे ट्रेलर याच मार्गावरून धावत असतात. पहाटेच्या शिफ्टला जाणाऱ्या कामगारांना या धुक्यातून मार्ग काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


फोटो कॅप्शन : बदलत्या हवामानामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ कागच भिरकावणारे सहा खासदार निलंबित, अध्यक्षांची कारवाई

Pankaja Munde: ''मला कालच कळलं होतं...'', पंकजा मुंडेंनी सांगितली हेलिकॉप्टरबद्दलची माहिती

'द अजित पवार' मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणालेले-

Latest Marathi News Live Update : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम

Sunetra Pawar Beed Pune district : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकत्व, शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT