मुंबई

थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी जीवदानाचा जागर

CD

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : थॅलेसेमियाग्रस्त निरागस बालकांच्या जीवन रक्षणासाठी उल्हासनगरमध्ये मानवतेचा जागर झाला. समाजभान आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत रोटरी क्लब ऑफ विठ्ठलवाडी आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेण्यात आले. हे शिबिर सुभाष टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कानसई रोड येथील मातृछाया बंगलो येथे पार पडले. शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
थॅलेसेमियाग्रस्त बालकांना नियमित रक्त पुरवठ्याची अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन ‘डोनेट ब्लड, सेव्ह द थॅलेसेमिया चाइल्ड’ या संकल्पनेतून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कुमार आयलानी यांनी उपस्थिती लावली. शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ विठ्ठलवाडीचे अध्यक्ष दयाल जयसिंघानी, गणेश क्षीरसागर, प्रकल्प अध्यक्ष डॉ. महेश क्षीरसागर आणि सचिव टेकचंद नोटानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरासाठी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी नियोजनबद्ध व समर्पित मेहनत घेतली. शिबिरादरम्यान थॅलेसेमिया या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. संकलित रक्त थॅलेसेमियाग्रस्त गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

तेव्हा त्याचे काही प्रॉब्लेम नव्हते... मराठी अभिनेत्रीने सांगितला मंदार देवस्थळीसोबतचा अनुभव; झी मराठीवरच केलेली मालिका

Ajit Pawar: कात्रज दूध संघाला ‘अजित पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय; 'असं' असेल पूर्ण नाव

Latest Marathi News Live Update: मुंबईला महापौर केव्हा मिळणार? अखेर तारीख ठरली

SCROLL FOR NEXT