मुंबई

आनंदवाडी येथे संत शिरोमणी रविदास महाराज मंदिर

CD

कल्याणमध्ये समाजमंदिराचे लोकार्पण
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : आनंदवाडी भागात संत शिरोमणी रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६च्या वतीने महाराज यांची ६४९वी जयंती अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. नूतन समाजमंदिराचे लोकार्पण आणि संत रविदास महाराजांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

रविवारी पार पडलेल्या या सोहळ्यात कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात आलेल्या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी महाराजांच्या मूर्तीची मंत्रोच्चाराच्या जयघोषात आणि शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे व अध्यक्ष राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंगलप्रसंगी सुरेश पवार, सोनी क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, भैरवनाथ वाघमारे, प्रकाश लांडगे, सोमनाथ राऊत यांच्यासह कविता रूपवते, मंगल गायकवाड, ललिता साबळे, वंदना नायडू, रेखा चंद्रे, रेश्मा शिरकर, रेखा साळे, अस्मिता गायकवाड, मंगल बनसोडे, कलावती शेवाळे आणि विठाबाई धनशेट्टी यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणूक मार्ग : केडीएमसी दवाखाना- गणपती मंदिर- कोळसेवाडी- उतेकर बिल्डिंग- दुर्गामाता मंदिर- डबल टॉवर ते आनंदवाडी समाजमंदिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Mahamarg alignment changed : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचा मार्ग बदलला, १२ ऐवजी १३ जिल्हांचा समावेश, राज्याच्या तिजोरीवर आणखी बोजा वाढणार

CM ममता बॅनर्जी बनल्या वकील, SIR प्रकरणी स्वत: मांडणार बाजू; सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडतंय

'शाळा' सिनेमाचा हिरो आहे 'आई कुठे काय करते'मधल्या ईशाचा होणारा नवरा; फोटो पाहून चाहते अवाक

Bhiwandi Mayor: भिवंडीच्या महापौर पदी कोण? १८ दिवसांनंतरही शिवसेनेची गटनोंदणी प्रलंबित

Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे कृषी आणि दुग्ध व्यवसाय धोक्यात? शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; सरकारने दिलं स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT