जनता हीच या देशाची खरी मालक
विवेक पंडित यांचे प्रतिपादन; गोवेलीत संविधानाचा जागर
कल्याण, ता. ३ (वार्ताहर): ‘‘देशाचे पंतप्रधान, जिल्हाधिकारी ते ग्रामसेवक हे सर्व जनतेचे सेवक आहेत. लोकशाहीत सामान्य जनताच या देशाची खरी मालक आहे,’’ असे परखड मत आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्रीदर्जा) तथा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले. कल्याण तालुक्यातील गोवेली येथे आयोजित ‘संविधानाचा जागर’ आणि ग्रामपंचायत आढावा बैठकीत ते बोलत होते.
जीवनदीप शैक्षणिक संस्था महाविद्यालय परिसरात पार पडलेल्या या बैठकीत विवेक पंडित यांनी प्रशासकीय यंत्रणेला खडे बोल सुनावले. गावातील आदिम कातकरी आणि आदिवासी समाजाला लागणारे शासकीय दाखले, मूलभूत कागदपत्रे आणि संविधानाने दिलेले हक्क मिळवून देण्यासाठी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कालबद्ध नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. आढावा बैठकीला तहसीलदार विकास गारुडकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी, गटविकास अधिकारी प्रभुनाथ गवारी, कामगार उपायुक्त अनघा क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा मुंजाळ, विस्तार अधिकारी पराग भोसले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र घोडविंडे, उपसरपंच काळुराम घुडे आणि ग्रामविकास अधिकारी जयेश थोरात यांच्यासह शासन व प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्रमजीवी संघटनेचा निर्धार
या वेळी श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सापटे, जिल्हा सचिव राजेश चन्ने, रूपेश डोळे, सीता घाटाळ यांच्यासह कल्याण तालुका अध्यक्ष वासुदेव वाघे आणि सुवर्णा कोट यांनी उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या.
या बैठकीमुळे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात थेट संवाद झाला असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.