मुंबई

कल्याणकारी मंडळाकडून नोंदणी सुरू

CD

कल्याणकारी मंडळाकडून नोंदणी सुरू
जव्हार, ता. ३ (बातमीदार) ः महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी तसेच अर्ज/कार्ड नूतनीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
ज्या बांधकाम कामगारांनी यापूर्वी नोंदणी केलेली नाही. तसेच ज्यांचे अर्ज काही कारणांमुळे बाद झाले आहेत, अशा कामगारांना नवीन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित कामगारांनी जॉब कार्ड व आधार कार्ड सोबत घेऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या मजुरीच्या दिवसांची तपासणी करून ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या बांधकाम कामगारांचे कामगार कार्डची मुदत संपली आहे, त्यांनी तत्काळ नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे.
--------------------------
योजनांचा लाभ मिळणार
कार्ड नूतनीकरण केल्यास शिष्यवृत्ती, आरोग्य विमा, प्रसूती सहाय्य, अपघात विमा, घरकुल सहाय्य यासह इतर अनेक लाभांपासून वंचित राहावे लागू शकते. कामगारांनी वेळेत अर्ज किंवा नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Airlines Cancels Flights: ‘इंडिगो’ने घेतला मोठा निर्णय! २८ फेब्रुवारीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं केली रद्द

Travel Tips For Parents: विमानात मुलांसोबत प्रवास करायचाय? मग ‘या’ 5 स्मार्ट टिप्स ठेवा लक्षात, ट्रॅव्हल होईल झकास!

Dhule ZP Schools : विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ थांबणार! धुळ्यातील १०८ जीर्ण वर्गखोल्यांवर फिरणार हातोडा

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

SCROLL FOR NEXT