मुंबई

उल्हासनगरच्या गोल्डन मार्केटमध्ये आग

CD

उल्हासनगरच्या गोल्डन मार्केटमध्ये आग
कपड्यांचा कारखाना जळून खाक
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर): शहरातील गजबजलेल्या कॅम्प नंबर २ येथील गोल्डन मार्केटमध्ये मंगळवारी (ता. ३) पहाटे भीषण आग लागली. या आगीत ''माहिर गारमेंट'' हा कपड्यांचा कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, पहाटेची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

नेहरू चौकाजवळ असलेल्या गोल्डन मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. अवघ्या काही मिनिटांत आगीने संपूर्ण मजला कवेत घेतला. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या; मात्र मार्केटमधील अरुंद गल्ल्या आणि दाट वस्तीमुळे बंबांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यात आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला.

तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत सकाळी सातच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत कारखान्यातील तयार कपडे, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जळून भस्मसात झाली आहे. आगीची तीव्रता इतकी होती की कारखान्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून सविस्तर चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत सी-६० पथक आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक; एक जवान शहीद, ३ माओवाद्यांना कंठस्नान

Shani Impact Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे' वर शनीचा प्रभाव पडेल; लवर्स 'या' 4 चुका करु नका

NMMC Mayor: नवी मुंबईच्या महापौरपदी विजयी झालेल्या सुजाता पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

Air Pollution & Mental Health: प्रदूषणामुळे डिप्रेशन-एंग्जायटीचा वाढतोय धोका! हवेतील PM2.5 चा मेंटल हेल्थशी थेट संबंध; तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT