अंबरनाथमध्ये आयुष्मान आरोग्य मंदिराचे लोकार्पण
नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांच्या हस्ते उद्घाटन
अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) ः राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर या संकल्पनेतून अंबरनाथमधील नागरिकांसाठी आपला मोफत दवाखाना सेवेत दाखल झाला आहे. निलयोगनगरमधील पाठारे पार्क येथे नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांच्या हस्ते या आरोग्य केंद्राचे उद्घाटन सोमवारी (ता. २) पार पडले. या सुविधेमुळे परिसरातील गोरगरीब रुग्णांना आता मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मीनाताई ठाकरे बहुउद्देशीय सभागृहात सुरू करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रासाठी माजी नगरसेविका रेश्मा काळे आणि भाजप सरचिटणीस राजेंद्र कुलकर्णी यांनी विशेष पाठपुरावा केला होता. उद्घाटनप्रसंगी बोलताना तेजश्री करंजुले यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसल्यास अंगावर आजार न काढता तातडीने या केंद्राचा लाभ घ्यावा, असे नागरिकांना आवाहन केले. या दवाखान्यात दररोज सकाळी १० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि आशा वर्कर उपलब्ध राहणार आहेत.
या आरोग्य मंदिरात संसर्गजन्य रोगांसोबतच मधुमेह (डायबिटीस), उच्च रक्तदाब (बीपी), क्षयरोग आणि कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांवर मोफत तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशन केले जाणार आहे. या सोहळ्याला भाजप राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, माजी नगरसेविका रेश्मा काळे, राजेंद्र कुलकर्णी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.