मुंबई

अपस्‍मार जनजागृतीची धाव

CD

अपस्‍मार जनजागृतीची धाव
हजारो धावपटूंचा सहभाग; आजाराचे गैरसमाज दूर करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : अपस्मार आजारविषयी समाजातील गैरसमज, भीती आणि कलंक दूर करण्यासाठी ‘सन्मान असोसिएशन’ने आयोजित केलेली ‘जियो सन्मान से रन २.०’ ही भारतातील सर्वात मोठी अपस्मार जनजागृतीसाठीची धाव ठरली. वांद्रे किल्ल्याच्या सागरकिनारी झालेल्या या उपक्रमात १,१०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
इंडियन एपिलेप्सी असोसिएशनच्या मुंबई विभाग असलेल्या सन्मान असोसिएशनतर्फे आयोजित या मॅरेथॉनमध्ये अपस्मारग्रस्त व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, डॉक्टर, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि फिटनेसप्रेमी नागरिक एकत्र आले होते. अपस्माराबाबत सन्मान, समावेशकता आणि समानतेचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आंतरराष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त आयोजित ही धाव आंतरराष्ट्रीय ब्युरो फॉर एपिलेप्सीच्या कॅम्पेनचा भाग होती. जगभरातील सुमारे ५० दशलक्ष अपस्मारग्रस्त व्यक्तींसाठी जनजागृती, हक्क आणि उपचारांपर्यंत पोहोच यावर या मोहिमेत भर देण्यात येतो.
अपस्मार जनजागृतीचे प्रतीक असलेल्या जांभळ्या रंगाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. अंटार्क्टिका आइस मॅरेथॉन पूर्ण करणारे पहिले भारतीय रॉबिन बेहल यांनी हिरवा झेंडा दाखवला. सन्मान असोसिएशनच्या सचिव डॉ. जयन्ती मणी म्हणाल्या, अपस्मार म्हणजे सन्मान, आणि या धावण्यात अनेक ‘एपिलेप्सी वॉरियर्स’ सहभागी झाले होते. फिटनेस आत्मविश्वास आणि सकारात्मकता देतो. योग्य माहिती दिल्यास अपस्माराबाबतची भीती आणि गैरसमज नक्कीच दूर करता येतात. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या सन्मान असोसिएशनने अपस्मारग्रस्त व्यक्तींच्या जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने जनजागृती उपक्रम, समुपदेशन, सहाय्य गट तसेच ग्रामीण भागात वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत. निदान, उपचार आणि थेरपीपर्यंत पोहोच नसलेल्या कुटुंबांपर्यंत संस्था पोहोचत आहे.

अपस्मारा आजारबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि रुग्णांसाठी समानतेचा संदेश देण्यासाठी ‘जियो सन्मान से रन’ यशस्वी ठरली. अपेक्षेपेक्षा अधिक सहभाग मिळाल्याने समाजात जागरूकतेची गरज किती मोठी आहे, हे सिद्ध झाले आहे. या चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानते.
- डॉ. संगीता रावत, अध्यक्ष, सन्मान असोसिएशन, अधिष्ठात्री, केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या पहिल्या सामन्यासाठी संजू सॅमसनला संधी, तर इशान किशन, कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच भरली जाणार नवी पदे; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विमाननगर परिसरात जोरदार राडा

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

SCROLL FOR NEXT