कळव्यात रंगणार कबड्डीचा थरार
कळवा (बातमीदार) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त वाढदिवसाचे औचित्य साधून कळव्यातील खारलँड मैदानावर ४ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘ महाराष्ट्रस्तरीय’ भव्य कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत १४ वर्षांच्या आतील मुले-मुली, १८ वर्षांखालील मुले-मुली, जिल्हा कुमार व कुमारी गट व खुला गट अशा चार गटांतून ठाणे जिल्ह्यातील २२५ खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आ. रवींद्र फाटक, आमदार महेश चौघुले, आमदार शांताराम मोरे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व ठाण्यातील नवनिर्वाचित नगरसेवक भेट देणार आहेत. तसेच मराठी अभिनेते मंगेश देसाई, सुशांत शेलार, प्रवीण तरडे, संतोष जुवेकर, विकास पाठक आदी सेलिब्रिटीची उपस्थिती राहणार आहे. विजेत्या गटांना व खेळाडूना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ९ फेब्रुवारीला बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक राजा ठाकूर व ॲड. पूजा ठाकूर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.