मुंबई

‘आयएसव्हीआयआर’च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

CD

‘आयएसव्हीआयआर’च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
अध्यक्षपदी प्रा. डॉ. अविनाश गुट्टे यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : इंडियन सोसायटी ऑफ व्हॅस्कुलर अँड इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी महाराष्ट्र शाखेच्या (आयएसव्हीआयआर) २०२५-२६ या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी ग्रँट मेडिकल कॉलेज व जे. जे. रुग्णालय, मुंबई येथील इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अविनाश गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश मुंडदा (नागपूर) यांच्या देखरेखीखाली बिनविरोध पार पडली.

नूतन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीचे प्रशिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा अधिक व्यापक करण्यावर भर दिला जाणार आहे. हे प्रगत उपचार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यासाठी आणि नव्या डॉक्टरांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थेच्या महाराष्ट्र शाखा सक्रिय भूमिका घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सचिवपदी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयाचे विभागप्रमुख डॉ. शिवाजी पोळे, तर उपाध्यक्षपदी सायन रुग्णालयातील प्रा. डॉ. विवेक उकिरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष-नियुक्त म्हणून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे विभागप्रमुख डॉ. यादव मुंडे यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदाची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. तेजस सदावर्ते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सहसचिव म्हणून डॉ. पृथ्वीराज जाधव आणि डॉ. स्वेनिल शाह (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई, नागपूर, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा कार्यकारिणी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

देशभरात १,२०० हून अधिक सदस्य

१९९७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने अवघ्या २८ सदस्यांपासून प्रवासाला सुरुवात केली. या संस्थेने देशभरात १,२०० हून अधिक सदस्यांची संघटना उभी केली आहे. इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी या शाखेत ‘पिनहोल’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्ट्रोक, रक्तवाहिन्यांचे आजार, व्हेरिकोज वेन्स तसेच कर्करोगावर विना-शस्त्रक्रिया प्रभावी उपचार केले जातात. कमी वेदना, कमी रुग्णालयात राहण्याचा कालावधी आणि जलद बरे होणे हे या उपचारांचे प्रमुख फायदे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashwantrao Chavan Open University : मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात राडा! 'आम्ही फक्त टाळ्या वाजवायला आलोय का?' पदवीधरांचा संताप

भारतात पहिल्यांदाच Redmi Note 15 Pro+ अन् Redmi Note 15 Pro ची विक्री सुरू; सेलमध्ये बंपर डिस्काउंट ऑफर्स, पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : म्हाडाच्या अंधेरीतील पीएमजीपी कॉलनीत छत कोसळले; एक जण जखमी

Viral Video: लिफ्टमध्ये हायड्रोजन फुगे घेऊन शिरताच भनायक स्फोट, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

SCROLL FOR NEXT