वाशी, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या वतीने ऐरोलीमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात येत हाेते. या बांधकामांवर अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त (अतिक्रमण हटाव विभाग) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालय अंतर्गत ऐरोली सेक्टर २ येथे बबन बाबू पवार, गुफरान खान (ठेकेदार), ओमकार निर्गुडे (वास्तुविशारद) यांनी, तसेच प्रेमानंद प्रजापती, गुफरान खान (ठेकेदार), ओमकार निर्गुडे (वास्तुविशारद) यांनी महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामाला जी विभाग कार्यालयामार्फत नोटीस बजाविण्यात आली होती. संबधितांनी अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते, परंतु त्यांनी बांधकाम सुरू ठेवले होते. या अनधिकृत बांधकामाला ऐरोली विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नैनेश बदले यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहीम करण्यात आली. तसेच अनधिकृत बांधकाम हटविण्याचे दंडात्मक शुल्क प्रति पाच हजारांप्रमाणे एकूण १० हजार रुपये वसूल करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.