मुंबई

श्री मलंगगडावर श्रद्धा आणि शिस्तीचे विराट दर्शन

CD

श्री मलंगगडावर श्रद्धा आणि शिस्तीचे विराट दर्शन
मशालींच्या प्रकाशात ‘जय श्रीराम’चा गजर
डोंबिवली, ता. ४ : माघ पौर्णिमेच्या निमित्ताने कल्याणजवळील श्री मलंगगडावर श्री मलंग मच्छिंद्रनाथांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि कडक शिस्तीत पार पडला. मशालींचा लख्ख प्रकाश आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. श्री मलंग मच्छिंद्रनाथांच्या पालखी सोहळ्यात यंदा श्रद्धा, परंपरा आणि संघटनात्मक शिस्त यांचे अभूतपूर्व दर्शन घडले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध हिंदुत्ववादी संघटना, धारकरी, वारकरी आणि गड परिसरातील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने मध्यरात्री गडावर उपस्थित होते.

रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले. विसाव्यावर परंपरेनुसार प्रथम हिंदू भाविकांना दर्शनाचा मान देण्यात आला. पालखीला खांदा देण्याचा मान तळोजा येथील कोळीबांधवांनी, पिठाच्या दिव्यांची परंपरा दाभणे कुटुंबाने, तर मशालींचा मान आदिवासी व फासेपारधी समाजातील बांधवांनी निभावून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तालयाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, तंबू आणि स्वयंसेवकांद्वारे गर्दी नियंत्रणाचे चोख नियोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडावर, पायथ्याशी तसेच संवेदनशील ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. या नियोजनामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता यात्रा यशस्वीरीत्या पार पडली.

‘मलंग मुक्ती’चा नारा
पालखी दर्शनादरम्यान भाविकांनी ‘मलंग मुक्ती’च्या घोषणा देत आपल्या श्रद्धा आणि परंपरेच्या रक्षणाचा निर्धार व्यक्त केला. श्रद्धा, शांतता आणि शिस्त यांच्या त्रिवेणी संगमामुळे यंदाची ही यात्रा हिंदू एकतेचे प्रतीक ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs USA T20 World Cup : भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडली, स्पर्धेतून बाहेर पडणार?

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! आता फक्त 8 दिवसांत मिळणार PF चे पैसे! काय आहे नवीन अपडेट? जाणून घ्या सर्व माहिती

Karad ZP Election : दुबार मतदारावरुन सैदापूर केंद्रावर वादावादी; दोन गट एकमेकांना भिडले, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला

ZP Elections 2026 Voting Live Update : पाचोड येथे आमदार विलास भुमरेंनी बजावला मतदानाचा हक्क, शाई प्रकरणावर खासदार संदिपान भुमरेंची प्रतिक्रिया

Malegaon Municipal Corporation : मालेगावचा महापौर कोण? इस्लाम पक्ष आणि शिवसेना आमनेसामने; 'एमआयएम'च्या भूमिकेवर गणिते अवलंबून!

SCROLL FOR NEXT