मुंबई

डोंबिवली पश्चिमेला तीव्र पाणीटंचाई

CD

डोंबिवली पश्चिमेत तीव्र पाणीटंचाई
थेंब थेंब पाण्यासाठी नागरिकांची वणवण
डोंबिवली, ता. ४ ः ऐन फेब्रुवारी महिन्यातच डोंबिवली पश्चिमेला तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील सह्याद्रीनगर, राजूनगर, सरोवरनगर आणि महालक्ष्मी चौक परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने व अपुरा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पालिकेने मोफत किंवा सवलतीच्या दरात वाढीव टँकर द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

अनेक भागांत तासाभरापेक्षाही कमी वेळ पाणी येत आहे. पहाटेच्या वेळी पाणी येत असल्याने गृहिणींची मोठी ओढाताण होत आहे. महापालिकेचे टँकर अपुरे पडत असल्याने नागरिकांना खासगी टँकरसाठी दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. अमृत योजना रखडली असून राजूनगर व गरिबाचा वाडा येथील पाण्याच्या टाक्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारींचा पाढा
माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. जोपर्यंत वितरण व्यवस्था सुधारत नाही, तोपर्यंत पालिकेने नियमितपणे टँकर पुरवठा करावा, असे निवेदनात म्हटले आहे. टाक्या बांधण्याचे काम कधी पूर्ण होणार आणि त्या पूर्ण झाल्यावर पाणी भरण्यासाठी जलवाहिन्यांचा आराखडा तयार आहे का, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.

या भागात टंचाई
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २२ मधील सह्याद्रीनगर, राजूनगर, सरोवरनगर, गरिबाचा वाडा, साईनगर, शंकेश्वरनगर तसेच महालक्ष्मी चौक परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने व अपुऱ्या वेळेस होत असल्याने नागरिकांना गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT