८७ वाहनचालकांकडून दंड वसूल
एचएसआरटी नंबर प्लेट तपासणी सुरू
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : रायगड जिल्हा वाहतूक पोलिसांकडून जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ज्या वाहनचालकांनी आपल्या वाहनांना एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नंबर प्लेट अद्याप बसविलेली नाही, अशा चालकांकडून दंड आकारण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. ३) अलिबागमधील ८७ वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. अलिबाग शहरातील कोर्ट परिसरात स्वतः जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी वाहनांची तपासणी केली.
एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) म्हणजे वाहनांसाठी असलेली एक सुरक्षित नंबर प्लेट आहे. चोरी आणि गैरवापर टाळण्यासाठी ती अनिवार्य करण्यात आली आहे. यात अशोकचक्राचा होलोग्राम आणि एक युनिक लेसर-ब्रँडेड पिन असतो. तो वाहनांच्या तपशिलाची नोंद ठेवतो. शासनाकडून मार्च २०१९ नंतरच्या सर्व वाहनांसाठी ही नंबर प्लेट आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ होती. मात्र अद्याप अनेक वाहनचालकांनी ही नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळे आता परिवहन विभागाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अलिबागमध्ये मंगळवारी शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, शासकीय कार्यालयांच्या परिसरात वाहतूक पोलिसांनी एचएसआरपी नंबर प्लेट न लावलेल्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. अलिबागमध्ये ८७ जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
कारवाई सुरूच राहणार
एचएसआरपी नंबर प्लेट न लावलेल्या वाहनचालकांवर पुढील काही दिवस अशीच कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तातडीने ही नंबर प्लेट बसवून नियमांचे पालन करावे आणि वाहतूक पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे रायगडचे जिल्हा वाहतूक निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी सांगितले.
फोटो - 654
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.