उपजिल्हा रुग्णालयाची स्वप्नपूर्ती
वाड्यातील वनविभागाची पाच एकर जागा मिळणार
वाडा, ता. ४ (बातमीदार) ः वाडा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय जागा मिळत नसल्याने रखडले होते. अखेर भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या प्रयत्नातून वनविभागाची पाच एकर जागा मिळणार आहे. त्यामुळे चार वर्षांपासून रखडलेल्या रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाडा येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे; पण वाढत्या लोकसंख्येला उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा पुरवण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. गरोदर महिला, सर्पदंश, अपघात झालेले रुग्णांना ठाणे, मुंबईचा प्रवास करावा लागतो. २०२१ मध्ये राज्य सरकारने ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिली; मात्र आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने चार वर्षांपासून रुग्णालय रखडले होते.
--------------------------
उमरोठे रस्त्यावर उभारणी
रुग्णालयाला एसटी महामंडळाची जागा मिळावी, म्हणून अदलाबदलीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यासाठी वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यादव शेखरे, बांधकाम विभागाचे अधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकाऱ्यांमध्ये बैठका झाल्या. जागा अदलाबदलीचा प्रस्ताव बारगळला होता. अखेर उमरोठे रोडलगत वनविभागाची जागा देण्याला मान्यता मिळाली आहे.
--------------------------------
गेल्या चार वर्षांपासून जागेच्या शोधात होतो. अखेर वनविभागाची जागा मिळाल्याने नवीन रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
- डाॅ. यादव शेखरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.