मुंबई

रसायनयुक्त पाण्याने आरोग्यास धोका

CD

रस्त्यावर रसायनयुक्त पाणी
भिवंडीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नारपोलीत संतापाची लाट

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : शहरातील नारपोली येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या शंकर डाइंगमधील रसायनयुक्त पाणी गटारातील सांडपाण्यातून अहोरात्र मुख्य रस्त्यातील नारपोली चौकात जमा होत आहे. त्यामुळे चौकाजवळच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि पादचाऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. भिवंडी निजामपूर महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण या गंभीर समस्येकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्याबाबत स्थानिकांनी महापालिका प्रशासनाला निषेध आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शहरातील भिवंडी-ठाणे या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यादरम्यान नारपोली गावात जाणारा चौक असून, येथे नेहमी गटारे साफ न केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूचे पाणी रस्त्यावर साचलेले असते; मात्र नारपोली गावात जाणाऱ्या मार्गावर २०-२५ पावलांवर हिंदी भाषिक शाळा आहे. तसेच परिसरात पालिकेचीदेखील शाळा आहे. नारपोली गावाची मोठी लोकवस्ती असून, येथील रहिवाशांचा आरोप आहे की, शंकर डाइंग या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत कापड रंगवणाऱ्या बॉयलरमधील गरम व रसायनयुक्त पाणी थेट गटारात सोडले जाते. त्यामुळे ठाणे मार्गावरील अंजूरफाटा ते धामणकर नाका या मुख्य रस्त्यावर सतत घाणेरडे पाणी साचलेले असते.

नारपोली चौकातील दोन ते तीन शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांना दररोज या दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढावी लागते. यामुळे त्वचारोग आणि श्वसनाचे आजार बळावण्याची भीती आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचा व्हॉल्व साचलेल्या सांडपाण्याच्या अगदी जवळ आहे. हे दूषित पाणी जलवाहिनीत शिरल्यास परिसरात मोठी साथ पसरण्याची भीती आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे डांबरी रस्त्याचे नुकसान होऊन मोठे खड्डे पडले आहेत. निसरड्या रस्त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले असून, वाहतूक कोंडीची समस्याही जटिल झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात हे पाणी वाहत असते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून गटार चोकअप झाल्याने हे पाणी रस्त्यावर साचून राहत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या १५ दिवसांपासून परिस्थिती बिकट झाली आहे. कंपनीच्या बॉयलरमधील गरम आणि रासायनिक पाणी थेट गटारात सोडले जाते, तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळ (कल्याण) यावर कोणतीही कारवाई का करीत नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. स्थानिक रहिवाशांनी दोषी डाइंग कंपनीवर कठोर कारवाई करण्याची आणि तात्काळ गटार सफाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले न उचलल्यास मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा नारपोलीकरांनी दिला आहे.

नारपोली गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील गटाराचे बांधकाम वाहनांमुळे तुटले असून, ते चोकअप झाले आहे. या दुरुस्तीचे काम मंजूर झाले असून, येत्या आठवड्यात ते प्रत्यक्ष सुरू करण्यात येईल.
- सचिन नाईक, अभियंता, बांधकाम विभाग, भिवंडी महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra local politics news : सदाभाऊ खोतांनी जयंत पाटलांची गावरान भाषेत खिल्ली उडवली, जिल्हा परिषद राजकारण तापलं

Bharat Taxi : ओला-उबरला पर्याय आला! स्वस्त दरात सुरक्षित प्रवास देणारे ‘भारत टॅक्सी’ अ‍ॅप आज होणार लाँच; जाणून घ्या सर्व माहिती

Latest Marathi News Live Update : गुजरात उच्च न्यायालयाने आसाराम बापूची ४५,००० चौरस मीटर जमीन परत मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या कारवाईला मान्यता दिली

Rose Day Dessert Recipes : व्हॅलेंटाईन वीकची गोड सुरुवात! Rose Day ला गुलाबाचे 3 भन्नाट डेजर्ट ट्राय करा

Jaykumar Gore:औंधसह २१ गावांना तीन वर्षांत पाणी देणार: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे; यापुढची निवडणूक पाणीप्रश्नावर होणार नाही!

SCROLL FOR NEXT