मुंबई

केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताकडे दमदार पाऊल

CD

पनवेल, ता. ४ (बातमीदार) : केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या वेगवान विकासाला नवी दिशा देणारा, सर्वसमावेशक प्रगतीचा ठोस आराखडा आहे. विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन अर्थसंकल्प कोकण संयोजक तथा आमदार निरंजन डावखरे यांनी केले. पनवेल येथील मार्केट यार्डमध्ये मंगळवारी (ता. ३) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक परिवर्तनाचा मजबूत पाया ठरेल, असेही आमदार डावखरे यांनी नमूद केले. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करून जागतिक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सीतारामन यांचे त्यांनी अभिनंदन केले. या पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

आमदार डावखरे म्हणाले, की या अर्थसंकल्पात एफडीआयच्या माध्यमातून सेमीकंडक्टर, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्ससारख्या उच्च तंत्रज्ञान उद्योगांमध्ये गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात रोजगारनिर्मिती होऊन युवकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच हातमाग, पारंपरिक उद्योग व स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देत समावेशक विकासाचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. आमदार महेश बालदी यांनी सांगितले, की हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार असून रायगड जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण व रोजगार संधींना मोठी चालना मिळणार आहे.

बागायतदारांना चालना
महाराष्ट्र व कोकणासाठीच्या घोषणांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, की नारळ व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येणार आहे. पारंपरिक औद्योगिक क्लस्टर्सच्या पुनरुज्जीवनामुळे रोजगार व निर्यात वाढेल. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला गती मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: मुंबई महापालिकेत पवारांचा वेगळाच गेम! एकमेव नगरसेवकाची साथ भलत्याच पक्षाला?

Gold And Silver Rate: सोने-चांदीसाठी ‘सुवर्णकाळ’? दरांबाबत बाबा वांगांचा धक्कादायक अंदाज; नेमका काय दावा केला?

FASTag Annual Pass : अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० लाख जणांनी खरेदी केले ‘फास्टॅग’ वार्षिक पास!

Horoscope: उद्या 7 फेब्रुवारीला 'या' 4 राशींचे नशीब चमकणार! अनपेक्षित धनलाभ; नात्याला येईल नवे वळण, कामाच्या ठिकाणी गुड न्यूज

Horoscope Prediction : फक्त 10 दिवसांमध्ये बदलणार तीन राशींचं नशीब ; महालक्ष्मीच्या कृपेने होणार अफाट श्रीमंत

SCROLL FOR NEXT