दिवा रेल्वे स्थानकात वर्गणीसाठी मारहाण
कटरने हल्ला करणारा अटकेत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर १०० रुपये वर्गणी न दिल्याच्या कारणावरून अशोक बाजीराव डुमरे (वय ५५) यांच्यावर कटरसारख्या धारदार वस्तूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस (जीआरपी) ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यप्रदेश येथील हल्लेखोर बबलु उर्फ अण्णा मोकमसिंह राठोड (वय ४०) याला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
मुळचे बीडचे असणारे व सध्या शहाड येथे राहणारे जखमी अशोक डुमरे हे बाटल्या गोळ्या करण्याचे काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, ते २ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या सुमारास दिवा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर शहाड येथे जाण्यासाठी आले होते. तेव्हा हल्लेखोर बबलु राठोडने त्यांच्याकडे १०० रुपयांची वर्गणी मागितली. वर्गणी न दिल्याच्या कारणावरून बबलूने डुमरे यांना शिवीगाळ करत कटरसारख्या वस्तूने उजव्या हातावर हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हल्लेखोराला अटक करून त्याच्याकडून लोखंडी ब्लेड असलेला हिरव्या रंगाचा प्लास्टिक कव्हरयुक्त कटर जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख, पोलिस हवालदार सुतार, पोलिस शिपाई केदार, बैनाडे व महाजन यांनी डी.बी. पथकाच्या मदतीने सापळा रचत हल्लेखोराला दिवा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात आणून २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. एच. सुतार करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.