मुंबई

कासारवडवलीत मोबाईल दुकान फोडून सात लाखांचे स्मार्ट घड्याळ लंपास

CD

कासारवडवलीत मोबाईल दुकान फोडून सात लाखांचे स्मार्ट घड्याळ लंपास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे : कासारवडवली परिसरात अनोळखी चोरट्यांनी मोबाईल दुकान फोडून तब्बल ६ लाख ८२ हजार ८३५ रुपयांचा ५३ मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने घोडबंदर रोड परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कासारवडवली नाका या परिसरात राहणारे मोबाईल दुकानदार तथा तक्रारदार अशोक वैष्णव (५१) यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांचे घोडबंदर रोडवरील साई निवास इमारतीत “ओमसाईराम इलेक्ट्रॉनिक” नावाचे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानाच्या शटरचा लोखंडी ग्रीस तोडलेला, शटर वाकवलेले तसेच दोन्ही बाजूंचे कडी-कोयंडे तुटलेले आढळून आले.दुकानात प्रवेश केल्यानंतर काउंटर व रॅकमध्ये विक्रीसाठी ठेवलेले वेगवेगळ्या कंपनीचे नवीन मोबाईल फोन, स्मार्ट घड्याळे तसेच वायफाय सेटअप बॉक्स चोरीला गेल्याचे निदर्शनास आला नाही. या घटनेत तीन लाख ५१ हजार ९५५ रुपयांचे विवो कंपनीचे १८ मोबाईल, २५ हजार ५९० रुपयांचे ओप्पोचे २ मोबाईल, एक लाख ६९ हजार ३४० रुपयांचे सॅमसंगचे ९ मोबाईल, ४४ हजारांचे रेडमीचे ५ मोबाईल, ३५ हजार ४०० रुपयांचे पोकोचे ४ मोबाईल, १६ हजार ५५० रुपयांचे लावाचे १२ मोबाईल , १९ हजार ६०० रुपयांचे टेक्नोचे २ मोबाईल, तर १२ हजार ९०० रुपयांचे मोटो कंपनीचा १ मोबाईल आणि १५ हजार ५०० रुपयांचे ५ स्मार्ट घड्याळे , ५०० रुपयांचा जिओ कंपनीचा वायफाय सेटअप बॉक्स तसेच दुकानातील दीड हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''अजित पवारांचं विमान जमिनीला टच होण्याआधीच स्फोट? विमानात बॉम्ब...'', खासदाराने उपस्थित केले प्रश्न

RBI Monetary Policy : किसान क्रेडिट कार्डबाबत RBI चा महत्त्वाचा निर्णय! शेती कर्ज होणार सोपे, जाणून घ्या अपडेट

Shukra Gochar 2026: शुक्र कुंभ राशीत प्रवेश करतोय! ‘या’ राशींचे बिघडलेले काम होणार पूर्ण, धन-प्रेमात लाभ

अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवणी; काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव; AIMIM च्या एका नगरसेवकाची भाजपला साथ

Navi Mumbai: नवी मुंबईत बिबट्याचा धुमाकूळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT