प्रभाग १८ मध्ये कृतज्ञता व उत्सव सोहळा
नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : प्रभाग क्र. १८ मधील नागरिक, सहकारी, हितचिंतक व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर कृतज्ञता व उत्सव सोहळा आनंदी वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण महिला विशेष हळदी-कुंकू कार्यक्रम ठरला, ज्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्सवाची रंगत वाढली.
या वेळी नवनिर्वाचित ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत, नगरसेवक निशांत भगत, नगरसेविका प्रीती भगत, समाजसेवक संदीप भगत तसेच माजी नगरसेविका वैजयंती भगत, रुपाली भगत व फशीबाई भगत यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत निवडणुकीत मिळालेल्या विश्वास व पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच हा यशस्वी प्रवास शक्य झाल्याचे सांगत, पुढील काळात विकास, स्वच्छता, सुरक्षा व मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देत प्रभाग १८ च्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.