खासदारांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध महिलेच्या उपचारासाठी आर्थिक मदत
नगरसेवक अब्दुल शेख यांचा अनोखा उपक्रम
अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) ः कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये सामाजिक जाणिवेचा आदर्श ठेवणारा उपक्रम राबविण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या पुढाकारातून शास्त्रीनगर परिसरातील एका गरजू महिलेला मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तब्बल १५ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली.
अंबरनाथ पश्चिम येथील शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या तेरिसम्मा अरुलदास या (वय ६४) मोतीबिंदूच्या आजाराने त्रस्त होत्या. उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने त्या दीर्घकाळ उपचारांपासून वंचित राहिल्या होत्या. मात्र, वेळेवर मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे त्यांच्यावर उपचार शक्य झाले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील समाधान व्यक्त केले. खासदारांच्या वाढदिवसानिमित्ताने केवळ औपचारिक कार्यक्रम न करता गरजू व्यक्तीच्या आरोग्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याने सामाजिक बांधिलकीचा खरा अर्थ अधोरेखित झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
यावेळी नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी लवकरच अंबरनाथमधील झोपडपट्टी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरीब व गरजू नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करून समाजातील दुर्लक्षित घटकांना मदतीचा आधार देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अरुलदास कुटुंबाने अब्दुलभाई यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.