मुंबई

झेडपीच्या १३७ शाळांना सौरप्रकाशने उजळणार

CD

झेडपीच्या १३७ शाळा सौरप्रकाशाने उजळणार
वीजबिल येणार शून्यावर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यात निधीअभावी अनेकदा वीजपुरवठा खंडित होणे, त्यामुळे अध्यापनात शिक्षकांना येणाऱ्या अडचणी याची दखल घेत, ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे सौरऊर्जीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार झेडपीच्या १३७ शाळांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून लवकरच शाळा सौरप्रकाशाने उजळणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांचे वीज देयक न भरल्यामुळे अनेकदा शाळेचे मीटर काढून नेण्याचे प्रकार घडले होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळा निर्माण होत होता. याची दाखल घेत, लक्षात घेऊन मुरबाड तालुक्यातील मिल्हे जिल्हा परिषद शाळेत सौरऊर्जेचा प्रयोग करण्यात आला होता. या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे वर्षभराचे वीजदेयक २२ ते २३ हजार रुपयांपर्यंत येत होते. हा प्रकार टाळण्यासाठी महावितरणच्या नेट मीटरिंग योजनेंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन केले. या मिल्हे गावात एक बंद अवस्थेतील सौरऊर्जा प्रकल्प पडून होता. या प्रकल्पातील दोन बाय तीन आकाराच्या आठ सोलर प्लेट जिल्हा परिषदेच्या शाळेत आणून हा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येत होता. त्यातून या शाळेची सुटका झाली आहे. मुरबाड येथील शाळेवरील सौरऊर्जा प्रकल्प हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील झेडपीच्या शाळांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करण्यात आले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार १३१ शाळा आहेत. या शाळांचे टप्प्याटप्प्याने सौरऊर्जीकरण करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार यापूर्वी जिल्ह्यातील ४६ शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. त्यानंतर आता १३७ शाळांचे सौरऊर्जीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रियादेखील राबविण्यात आली असून त्यास प्रतिसाद मिळाल्यास कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे वीजबिलामध्ये बचत होऊन वीजबिल शून्यावर येणार असल्याचा दावादेखील जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
..................................
चौकट
सौरऊर्जा प्रकल्पाचा बहुरंगी फयदा होणार असून यामुळे शाळांमध्ये अविरत विद्युत पुरवठा सुरू राहणार आहे. यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविताना वीजपुरवठा खंडित होऊन येणाऱ्या अडचणी टळणार आहे. तसेच हा प्रकल्प पर्यावरणपूरकदेखील आहे. तसेच भविष्यात शाळांबरोबरच शासकीय इमारती, हॉस्पिटल, ग्रामपंचायत आदींवर सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election Pune Crime : पुणे येथील अजित पवार गटाच्या उमेदवार पतीवर जिवघेणा हल्ला, पोलिस बंदोबस्त वाढवला

ZP Elections 2026 Voting Live Update : माळशिरस तालुक्यात चुरशीने मतदान

Mumbai News: राज्यातील सहकारी बँकेतील ‘सत्ताधीशां’ना धक्का; संचालकांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षेच, बँकांचे राजकारण ढवळून निघणार!

T20 World Cup: आजोबा, वडिलांनंतर आता पुण्याचा शुभम आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार; भारताविरुद्ध मैदानात उतरणार

Voting Before Wedding: मतदानाचा हक्क बजावून नवरदेवाची लग्नाकडे धाव; तांबवेतील विक्रम पाटील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेत!

SCROLL FOR NEXT