मुंबई

बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणार

CD

बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणार
पालकमंत्री गणेश नाईक यांची घोषणा, जिल्हा नियोजन समितीत निर्णय
पालघर, ता. ४ (बातमीदार)ः पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या संकुलात बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय आज पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना आदिवासी घटक कार्यक्रम सर्वसाधारण व विशेष घटक योजना २०२६़२७ च्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तर जिल्हा वार्षिक योजना आदिवासी घटक कार्यक्रम सर्वसाधारण व विशेष घटक योजना सन २०२५ २६ अंतर्गत माहे जानेवारी २०२६ शाखेचा खर्चाचा आढावा घेण्यात आला यामध्ये अर्थसंकल्प तरतूद ७९९४२.५० लाख प्रशासकीय मान्यता ५५९५५.९० लाख वितरित निधी २७०३५.७५ लाख झालेला खर्च २०२४८.११ लाख मंजूर कामे व लाभार्थी संख्या १८४२१८ आतापर्यंत झालेला खर्च २५% जिल्हा वार्षिक योजना सन २०२५ २६ अंतर्गत पुनर्वियो नियोजनाचे प्रस्तावास मान्यता व बचत होणाऱ्या निधीचे पुनर्विचे नियोजन करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले. यावेळी बैठकीत आमदार विलास तारे यांनी पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याने बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्री यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकुलामध्ये बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्यासाठी नियोजन समितीच्या बैठकीत ठराव मांडताना जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Airlines Cancels Flights: ‘इंडिगो’ने घेतला मोठा निर्णय! २८ फेब्रुवारीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं केली रद्द

Travel Tips For Parents: विमानात मुलांसोबत प्रवास करायचाय? मग ‘या’ 5 स्मार्ट टिप्स ठेवा लक्षात, ट्रॅव्हल होईल झकास!

Dhule ZP Schools : विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ थांबणार! धुळ्यातील १०८ जीर्ण वर्गखोल्यांवर फिरणार हातोडा

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

SCROLL FOR NEXT