मुंबई

डिजिटल शिक्षणाला चालना

CD

डिजिटल शिक्षणाला चालना
मेघेपाडा जिल्हा परिषद शाळेत वायफाय सुविधा सुरू

विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील मेघेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती आणि डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा प्रकाश मेघा यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.
या वायफाय सुविधेमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, डिजिटल अभ्यासक्रम, शैक्षणिक व्हिडिओ, ई-लर्निंग अ‍ॅप्स तसेच विविध शैक्षणिक वेबसाईट्सचा वापर करून अधिक प्रभावी पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. चित्रे, व्हिडिओ आणि अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून विषय अधिक सुलभ होऊन विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता आणि शिक्षणातील रुची वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पाठ्यपुस्तकांबरोबरच नवीन संशोधन, चालू घडामोडी आणि अतिरिक्त माहिती सहज उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळेल. स्व-अध्ययनाची सवय लागून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रजासत्ताकदिनी झेंडावंदन कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना प्रकाश मेघा यांनी शैक्षणिक विकासासाठी विविध मुद्दे मांडले होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणपद्धतीत सुधारणा व्हावी, डिजिटल शिक्षणाला चालना मिळावी आणि ग्रामीण भागातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने वायफाय सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी प्रकाश मेघा यांचे आभार मानले असून, या सुविधेमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
-------------
यामुळे शिक्षकांनाही स्मार्ट बोर्ड, पीपीटी, ऑनलाइन टेस्ट, व्हिडिओ लेक्चर यांसारख्या डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करता येणार आहे. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती व विविध सराव प्रश्नपत्रिकांची तयारी शाळेतच करून घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल कौशल्यांचा विकास होऊन ग्रामीण व शहरी शिक्षणातील दरी कमी करण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New IPO : भारतातील पहिला AI आयपीओ 9 फेब्रुवारीला शेअर बाजारात! GMP मध्ये चांगल्या नफ्याची शक्यता; संपूर्ण माहिती इथे...

Marriage Tips : लग्नानंतर 99 टक्के लोक विसरतात एक काम; नंतर माराव्या लागतात कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या, पाहा तुम्ही 'हे' केलंय का?

Galentine’s Day म्हणजे काय आणि कसा साजरा करावा? जाणून घ्या एका क्लिकवर

Nashik Municipal Corporation : नाशिकवर भाजप-शिवसेना युतीचा भगवा; हिमगौरी आहेर महापौर तर विलास शिंदे उपमहापौर!

Mumbai Deputy Mayor : मुंबईच्या उपमहापौरपदासाठी महायुतीकडून कुणाचं नाव? अमित साटम यांनी केली घोषणा; वाचा...

SCROLL FOR NEXT