परेश नाका-एकदरा रस्त्याच्या डागडुजीची मागणी
नगरसेवक ॲड. रुपेश पाटील यांचे निवेदन; पर्यटन शहरातील प्रवेशद्वाराची दुर्दशा
मुरूड, ता. ५ (बातमीदार) : मुरूड-जंजिरा नगर परिषद हद्दीतील परेश नाका ते एकदरा पुलापर्यंतचा रस्ता अक्षरशः चाळणीसारखा झाला असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगर परिषदेच्या अखत्यारीत वर्ग करून तातडीने डागडुजी करावी, अशी जोरदार मागणी नगरसेवक ॲड. रुपेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूड शहराच्या सुशोभीकरणासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी कोट्यवधींचा निधी दिला असून, शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र, शहराच्या प्रवेशद्वारापासूनचा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने हा विकास झाकोळला जात आहे. विशेषतः मच्छी मार्केट व भगवान श्री महावीर भाजी मार्केट परिसरातील अयोग्य पार्किंग, वाहतूक नियमनाचा अभाव आणि रस्त्यावर बसणारे विक्रेते यामुळे नागरिक व पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
चौकट
ठोस उपाययोजनांची मागणी
मच्छी मार्केट व भाजी मार्केट परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व योग्य जागा निश्चित करावी, जेणेकरून वाहतुकीचा अडथळा कमी होईल. तसेच मुख्य बाजारपेठेतील अनधिकृत फेरीवाले, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या हातगाड्या आणि समुद्रकिनाऱ्यालगत रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते नगर परिषदेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून नगर परिषद फंडातून हा रस्ता दुरुस्त करावा, ही प्रमुख मागणी आहे. निवेदन सादर करताना ॲड. कुणाल जैन, नगरसेवक श्रीकांत खोत, दीपक पालशेतकर, दीपक मयेकर, किरण सुर्वे, आशीष पालशेतकर, किरण सातविकर, गणेश मिरजणकर व शैलेश वारेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.