मुंबई

विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन

CD

विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन
दोशी महाविद्यालयात ‘बाझार’ उपक्रम

घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) : घाटकोपरस्थित एस.पी.आर.जे. कन्याशाळा संचालित पी. एन. दोशी महाविद्यालय (स्वायत्त) येथील जी. एल. जवेरी मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) विभागाद्वारे वार्षिक उद्योजक कार्यक्रम ‘बाझार’ पार पडला. उपक्रमादरम्यान मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थिनींना अनोखी व नावीन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते.
उत्पादनांची संकल्पना, डिझाइन आणि प्रदर्शन त्याचप्रमाणे मांडणी कॅम्पसमधील स्टॉलवर करण्यात आली होती. उत्पादने विक्रीसाठी ग्राहकांसमोर खुली ठेवण्यात आली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या, उपप्राचार्या, विद्यार्थी, प्राध्यापक, पालक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनींची उत्पादने विकत घेतली.
कार्यक्रमात हॅम्पर्स, हेअरस्टाइलिंग सेवा, मोबाइल ॲक्सेसरीज, इंटरएक्टिव्ह गेम्स, खाद्यपदार्थ आणि पेय, दागिने, सौंदर्यप्रसाधने, भेटवस्तू आणि घरगुती गरजेच्या वस्तू यांसारख्या विविध प्रकारच्या ऑफर्सचे प्रदर्शन करण्यात आले. उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी उत्पादन विकास, विपणन, विक्री धोरणे, ग्राहक वर्तन आणि उद्योजकता यांसारख्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळवला. स्पर्धात्मक भावना आणि व्यावसायिक बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्वाधिक विक्री आणि नफा मिळवणाऱ्या दोन संघांना बक्षिसे देण्यात आली. या अनोख्या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आशा मेनन यांनी मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थिनींचे कौतुक केले. त्याचप्रमाणे बीएमएस विभागाच्या विभागप्रमुख डॉ. विना शेटे, शिक्षक अमिशी तुरखिया, जिनल ठक्कर, पूजा दीक्षित आदी उपक्रमाच्या आयोजनात सहभागी झाले होते.

फोटो - 916

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Orders Mamata Banerjee Government : सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का! ; २० लाख कर्मचाऱ्यांना २५ टक्के महागाई भत्ता द्यावा लागणार

लग्नाआधीच मृणाल ठाकूर गरोदर? अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Yeola Farmers Protest : कांद्याला हमीभाव द्या! येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडून 'रास्ता रोको'

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आमचेच निधीही आम्हीच देणार - नितेश राणे

Valentines Week 2026 Calendar: रोझ डे ते किस डे...प्रेमाचा आठवडा होतोय सुरू! कोणत्या दिवशी कोणता 'डे'? नोट करा संपूर्ण कॅलेंडर

SCROLL FOR NEXT