मुंबई

भिवंडी भादाणे येथील प्रस्तावित एम आय डी सी जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध

CD

जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध
भिवंडीतील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

भिवंडी, ८ (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या भादाणे, आतकोली, वाशेरे येथील ९९ हेक्टर जमीन एमआयडीसीला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी भिवंडी येथे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन या भूसंपादनास विरोध दर्शविला आहे. स्थानिक बाधित शेतकरी प्रकाश भोईर, चंदू जाधव, ॲड. संदीप जाधव, रमेश शेलार, गुरुनाथ भोईर, प्रदीप भोईर, संतोष राऊत, रवींद्र पाटोळे आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.
एमआयडीसीसाठी येथील जमीन अधिग्रहित करीत असल्याचा शासन निर्णय २८ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार, खणीकर्म विभागांकडून काढण्यात आला आहे. त्यानंतर भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून १४ जानेवारीला स्थानिक शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने येथील बाधित शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शासनाने हा निर्णय स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणतीही पूर्व सूचना न देता घेतला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या कारणांनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत, परंतु बाधित शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक मोबदला देण्यात आला नाही, असा आरोप प्रकाश भोईर यांनी केला आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी ठाणे यांनी भूसंपादनासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची सक्षम अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. शासनाकडून योग्य तो अध्यादेश काढून एमआयडीसी भूसंपादन कायद्याप्रमाणे प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्याबाबत हरकत घेतली आहे. त्यांचे म्हणणे शासन स्तरावर पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी दिली.

योग्य दर देण्याची मागणी

जर शासनाला आमच्या जमिनी अधिग्रहित करायच्याच असतील, तर किमान १० ते १२ लाख रुपये प्रति गुंठा दर शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी करीत, शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास न्यायालयीन लढाई सोबतच शेतकरी रस्त्यावरची लढाई उभी करून शासनास हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडेल, असे ॲड. संदीप जाधव म्हणाले.

फोटो - 178

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापुरातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांची कन्या विजयी

Parbhani ZP Election: घराणेशाहीला बसवलं घरात! वरपुडकरांच्या मुलगा, मुलगी, सुनेसह पुतण्याचाही पराभव; माजी मंत्र्याला मोठा धक्का

Jawali Taluka ZP and Panchayat Samiti Election Results : जावळीचे 'किंग' मानकुमरेच! चुरशीच्या लढतीत सेनेच्या उमेदवारावर मात; मंत्री शिवेंद्रसिंहराजे 'तो' शब्द पाळणार?

पुण्यात महापौर-उपमहापौर बिनविरोध; भाजपच्या विनंतीला मान देत काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली माघार

Kolhapur Zilla Parishad : शिरोळमध्ये यड्रावकर गटाला धक्का! दानोळीत राजू शेट्टींनी गड राखला, सातवेत राष्ट्रवादीचा मोठा विजय, राधानगरी तालुक्यात आबिटकरांना पहिला धक्का

SCROLL FOR NEXT