कांदळवनाच्या जमिनीवरील अतिक्रमणे जमीनदोस्त
भिवंडीत ५० गोदामांवर कारवाई
भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील गावाच्या हद्दीतील खाडीलगत असलेल्या कांदळवन व खाजण जमिनीवरील अतिक्रमण केलेल्या सुमारे ५० गोदामांवर तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली.
मौजे कशेळी हद्दीतील सर्व्हे क्रमांक १९३ मधील २२१ गुंठे जमीन ही शासकीय मालकीची आहे. या जमिनीवर नजीकच्या फर्निचर मार्केटची गोदामे बनवण्यात आली होती. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फर्निचर बनवण्याचे काम सुरू होते. ही जागा कांदळवनाची असल्याने वनखात्याच्या ताब्यात देणे आवश्यक होते. त्यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये एक अवमान याचिका दाखल होती. त्या अनुषंगाने या ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली. सहा जेसीबी व मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ वापरून येथील गोदमे भुईसपाट करण्यात आली. या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व स्थानिक नारपोली पोलिस सहभागी झाले होते. कांदळवनाच्या जमिनीवरील अतिक्रमणांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसीलदार अभिजित खोले यांनी सांगितले.
फोटो - 175
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.