मुंबई

वाशी खाडीत उडी मारणाऱ्या व्यक्तीला मच्छिमारांनी वाचवले

CD

रेल्वेतून खाडीत उडी मारणाऱ्याला मच्छीमारांनी वाचवले
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : पावणे गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने लोकलमधून वाशी खाडीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता. ५) घडली; मात्र वाशी खाडीत असलेल्या मच्छीमारांनी त्या व्यक्तीला नदीपात्रातून बाहेर काढले. भारत शिवराम फुलमाळी (३८) असे वाचवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, मानसिक तणावातून हे कृत्य केल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
घटनेतील बचावलेला व्यक्ती भारत हा अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यात राहणारा आहे. गुरुवारी (ता. ५) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तो पनवेल-सीएसएमटी लोकलमधून मुंबईत जात होता. या वेळी सिग्नल लागल्यामुळे लोकल वाशी खाडीपुलावर थांबली असताना, भारतने लोकलमधून थेट खाडीमध्ये उडी घेतली. सुदैवाने खाडीमध्ये ओहोटी असल्याने पाणी कमी होते. या वेळी भारत बुडत असल्याचे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. वाशी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याला याप्रकरणी माहिती देता आली नाही, त्यानंतर त्याचे समुपदेशन करून त्याला त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी’च्या पंधराव्या सीझनची थरारक झलक, रोहित शेट्टी पुन्हा होस्ट

ZP Election Result: ग्रामीणचा शिलेदार कोण? आज मतमोजणी; ५०२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

MPSC Recruitment Update : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 2 लाख 17 हजारांहून अधिक पदांची होणार भरती? परीक्षा व भरती प्रक्रियेतही बदलांची शक्यता

Kolhapur ZP : पहिला गुलाल दुपारी १२ वाजता! जिल्हा परिषद निवडणुकीचा थरार शिगेला २५० टेबलांवर मतमोजणी, १८८ फेऱ्या

SCROLL FOR NEXT