मुंबई

घाटकोपर कचरा बातमी

CD

२० वर्षांपासूनचा कचरा आजही कायम
घाटकोपरमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात

घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिमेकडील अल्ताफ नगर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचून जणू डम्पिंग ग्राउंडसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी घाटकोपर-अंधेरी लिंक रोडच्या कामादरम्यान केलेल्या कारवाईतून निर्माण झालेला माती, दगड व राडारोड्याचा ढिगारा आजही तसाच पडून आहे. या साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, त्याचा थेट परिणाम येथील रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे.
२००६ ते २००८ या कालावधीत लिंक रोडसाठी हजारो झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्या कारवाईनंतर उरलेला कचरा, माती व बांधकामाचा राडारोडा आजतागायत उचलला नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. परिणामी येथील नागरिकांना डेंगी, हिवताप यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
लिंक रोडच्या कामानंतर स्थानिक झोपडपट्टीवासीयांसाठी संरक्षक भिंत तसेच घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्थित गटार व्यवस्था न केल्यामुळे कचरा आणि सांडपाणी थेट लिंक रोडवर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर सांडपाणी वाहत असून वाहतूक तसेच नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन साचलेला कचरा हटवावा, व्यवस्थित गटार व्यवस्था व संरक्षण भिंतीची उभारणी करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याबाबत एन विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांना विचारले असता तातडीने संपूर्ण राडारोडा उचलला जाईल, असे त्यांनी सांगितले.

फोटो - 013

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI suryakant: “लोकप्रियतेसाठी कोर्टात आलात?” प्रशांत किशोर यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश संतापले! सुप्रीम कोर्टातच पोलखोल!

'मी सुद्धा तुझा आजोबाच आहे!' CM योगींचा चिमुकल्याशी संवाद; आपल्या गावात मुख्यमंत्री नाही तर 'घरचा माणूस' म्हणून वावरले

India vs Pakistan T20 World Cup : ‘फोर्स मॅज्योर’ची अट कशी लागू शकते, हे सिद्ध करा; ICC ने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या, आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मध्ये सिकल सेल वेलनेस हब बनणार

Panchang 8 Ferbruary 2026: आजच्या दिवशी आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT