मुंबई

‘जनगणने’चे पालिकेकडून धडे

CD

‘जनगणने’चे पालिकेकडून धडे
अधिकाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण, प्रगणकांची नेमणूक
विरार, ता. ७ (बातमीदार) ः वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात ‘जनगणना २०२७’ चे पहिले प्रशिक्षण पालिका मुख्यालयात पार पडले. या वेळी वसई-विरार शहर महापालिकेचे अधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली.
जनगणना हा देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया मानला जातो. जनगणनेच्या माध्यमातून देशाच्या लोकसंख्येचा अचूक आकडा मिळतो, ज्यावरून शासनाला विविध योजना व ध्येयधोरणे यांचे नियोजन करता येते. २०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते; परंतु कोरोना महामारीमुळे त्या वेळी जनगणना होऊ शकली नाही. याच अनुषंगाने २०२७ साठी वसई-विरार पालिकेत पहिल्या प्रशिक्षणामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामांची सविस्तर माहिती सहाय्यक संचालक जनगणना प्रवीण भगत आणि जनगणना अधिकारी मिलिंद पाटील यांनी सादरीकरणाद्वारे दिली. या कामासाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यावर निरीक्षणासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
--------------------------------
दोन टप्पे
- महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) प्रधान जनगणना अधिकारी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी, उपआयुक्त हर्षला राणे शहर जनगणना अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील. तर पालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त त्या विभागाचे मुख्य अधिकारी म्हणून काम करणार आहेत.
- मोबाईल ॲपद्वारे माहितीची नोंदणी होणार आहे. या जनगणनेची वैशिष्ट्ये म्हणजे जनगणना माहितीचा जलद प्रसार, जात प्रगणना, डिजिटल माहिती संकलन, स्व-गणना पोर्टल इ. आहेत. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी गटानुसार माहिती संकलित केली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची इतर माहिती संकलित केली जाणार आहे.
-----------------------------------------------------------------
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी जनगणना कामकाजासाठी प्रगणकांना नेमण्यात आले आहे. त्यांना योग्य माहिती देऊन राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सहकार्य करावे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT