झिम्बाब्वेतील विजयाचा वसईत जल्लोष
आयुषचे वडील भावुक, मेहनतीला यश आल्याची भावना
विरार, ता. ७ (बातमीदार) ः नालासोपाऱ्यांच्या आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात भारताच्या संघाने जागतिक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा आयुष दुसरा कर्णधार ठरला असून विरारच्या पृथ्वी शॉने यापूर्वी ही स्पर्धा जिंकली होती.
१४ वर्षांपासून देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे आयुष म्हात्रेचे वडील योगेश म्हात्रे यांनी सांगितले. या जल्लोषासाठी आम्ही इतकी वर्ष मेहनत करत होतो, आज या मेहनतीला यश आले. अंडर-१९ वर्ल्डकप एकदाच खेळायला मिळणार आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्याने क्रिकेटची बॅट हातात पकडली होती. भारताच्या टीमचे नेतृत्व करून देशासाठी वर्ल्डकप घेऊन आला आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही, असे मत त्यांच्या वडिलांनी व्यक्त केले. आयुषच्या नाळा येथील घरी ढोल-ताशे वाजवत मित्र, ग्रामस्थांनी हा आनंद साजरा केला.
-------------------------------
हितेंद्र ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
आयुष म्हात्रे हा वर्ल्डकपला जाण्यापूर्वी वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे प्रणेते आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्या वेळी आयुषला ठाकूर यांनी गणपतीची मूर्ती भेट दिली होती. या विजयाबद्दल हितेंद्र ठाकूर यांनी आयुषसह संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.