मुंबई

लोंबकळणाऱ्या विद्युत तारा काढण्यास सुरुवात

CD

लोंबकळणाऱ्या विद्युत तारा काढण्यास सुरुवात
शिरवणे गावात नगरसेविका माधुरी सुतार यांचे प्रयत्न
नेरूळ, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबईतील गावठाण भागात महावितरणच्या जुनाट व लोबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी या तारा घरांच्या खिडक्या, बाल्कनीजवळून गेल्याने शॉक लागणे व शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर शिरवणे गावातील भाजपच्या नवनियुक्त नगरसेविका माधुरी सुतार यांनी पाहणी करून महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानुसार शुक्रवारीपासून लोबकळणाऱ्या जिवंत तारा काढून त्या भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

चौकट
विद्युत तारा भूमिगत करण्यात येणार
विद्युत तारा भूमिगत करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना जिवंत विद्युत तारांपासून सुरक्षितता मिळणार असल्याचे माधुरी सुतार यांनी सांगितले. तसेच लवकरच विद्युत डीपी आणि आवश्यकतेनुसार नवी पोल लावण्यास सुरुवात होणार असल्याचेही सुतार म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP Number Plate न बसवल्यास वाहनधारकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री ! दररोज १००० रुपये दंड अन्...

धुरंधर २ मध्ये यामी गौतमची दमदार भूमिका, अ‍ॅक्शन रोलमध्ये दिसणार

Sant Gajanan Maharaj: पाणी देण्यास नकार दिला... संत गजानन महाराजांनी कोरडी विहीर सजल केली, प्रकट दिनानिमित्त अवश्य दर्शन घ्या…

Pune Schools: पुण्यातील ४७ टक्के खासगी शाळांची पाठ; शिक्षण हक्क कायदा, प्रवेश नोंदणीत शाळांचा हात आखडता

Mahavitaran: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कंत्राटी लाईनमनचा मृत्यू; परिसरात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT