मुंबई

प्रीमियरसाठीच्या बातम्या

CD

प्रीमियरसाठीच्या बातम्या


‘धुरंधर २’मध्ये यामी गौतमची खास भूमिका!

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असलेला ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, त्याचा दुसरा भाग अधिक भव्यदिव्य आणि प्रभावी असणार असल्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री यामी गौतमने चित्रपटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. ‘धुरंधर २’मध्ये ती स्वतः एका विशेष भूमिकेत झळकणार असल्याचे तिने स्पष्ट केले असून, तिच्या या भूमिकेचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची माहितीही दिली आहे. तिची व्यक्तिरेखा अ‍ॅक्शनप्रधान असून, कथेला वेगळे वळण देणारी ठरणार आहे. यामी म्हणाली, चित्रपटात अनेक कॅमियो भूमिका असणार आहेत. या छोट्या पण महत्त्वाच्या उपस्थिती कथानक अधिक रोचक आणि थरारक बनवतील. काही जुन्या सहकाऱ्यांच्या अनपेक्षित एन्ट्री प्रेक्षकांसाठी सरप्राइज ठरू शकतात, अशीही चर्चा आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ हा चित्रपट १९ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सणासुदीच्या काळात रिलीज करण्यात येत असल्याने बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


विशाल-अक्षया लवकरच विवाहबंधनात!
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार वैयक्तिक आयुष्यात नवे पर्व सुरू करत असतानाच, आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे. छोट्या पडद्यावर विविध भूमिकांमधून ओळख निर्माण करणारा अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता विशाल निकम लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तो मराठी मालिकांमधील अभिनेत्री अक्षया हिंदळकर सोबत लग्न करणार आहे. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून, अक्षयाच्या घरी पारंपरिक विधी पार पडत आहेत. नुकताच तिचा मेहंदी सोहळा झाला असून, त्या खास क्षणांचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने विशालला टॅग करत दिलेले कॅप्शन चाहत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. अक्षया आणि विशाल हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांच्या सहवासात आहेत. त्यांच्या नात्याबद्दल अधूनमधून चर्चा होत असतानाच, काही काळापूर्वी दोघांनीही हे नाते अधिकृतपणे स्वीकारले. ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर विशालने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर त्यांचे नाते अधिक चर्चेत आले होते. आता हे नाते लग्नाच्या रूपात पुढे नेण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे.


मनोज वाजपेयींचा ‘घूसखोर पंडत’ वादाच्या भोवऱ्यात!

दिग्दर्शक नीरज पांडे आणि अभिनेता मनोज वाजपेयी यांचा आगामी चित्रपट ‘घूसखोर पंडत’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या शीर्षकामुळे अपमान होत असल्याचा आरोप करत लखनऊत निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. वाद वाढल्यानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांनी अधिकृत निवेदन जाहीर करत चित्रपटाशी संबंधित सर्व प्रचार साहित्य तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ‘घूसखोर पंडत’ हा एक काल्पनिक पोलिस ड्रामा असून, ‘पंडत’ हा शब्द केवळ एका काल्पनिक पात्राचे टोपणनाव म्हणून वापरण्यात आला आहे. चित्रपट कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर एका व्यक्तीच्या कृती आणि निर्णयांभोवती कथा फिरते, असे त्यांनी नमूद केले. “चित्रपट निर्माते म्हणून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करतो. हा चित्रपट केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. मात्र, शीर्षकामुळे काही प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्या भावना आम्ही समजून घेतो,” असेही पांडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच त्याचा आशय समजेल, या भूमिकेतून प्रचार साहित्य हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेनंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळते आणि चित्रपट प्रेक्षकांसमोर कधी येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विशाल जेठवा-अनीत पड्डा एकत्र झळकणार!

हॉरर-कॉमेडी आणि हटके कथानकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅडॉक फिल्म्सच्या आगामी प्रकल्पांकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘मुंज्या’ आणि ‘थामा’सारख्या यशस्वी चित्रपटांनंतर आता मॅडॉकची नवी घोषणा असलेला ‘शक्ती शालिनी’ चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनीत पड्डा प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. आता तिच्यासोबत मुख्य अभिनेता म्हणून विशाल जेठवा दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘होमबाऊंड’सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या चित्रपटातूनही तो प्रेक्षकांसमोर आला. ‘शक्ती शालिनी’मधून तो वेगळ्या, तुलनेने सौम्य आणि रोमँटिक रंगात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयातील नव्या पैलूंची उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, अनीत पड्डा हिच्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या दोन कलाकारांची जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर येत असून, त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री कशी साकारली जाईल, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. सोशल मीडियावर या कास्टिंगबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रीकरण मार्च महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटात ॲक्शन, भावनिक क्षण आणि नात्यांचा संघर्ष यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. २४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्याआधी टीझर आणि अधिकृत माहितीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. विशाल जेठवा आणि अनीत पड्डा यांच्या अभिनयाची सांगड या नव्या चित्रपटाला किती वेगळे वळण देईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा जागतिक बोलबाला!

भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका असलेली वेबसीरिज ‘दलदल’ सध्या देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवरही चर्चेचा विषय ठरत आहे. प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, त्याबद्दल भूमीने स्वतः भावना व्यक्त केल्या आहेत. डीसीपी रीटा फरेरा या भूमिकेत दिसणाऱ्या भूमीच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले जात आहे. भूमी म्हणाली की, ‘या प्रवासात मिळालेले प्रेम आणि प्रामाणिक प्रतिसाद माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांनी कथा आणि रीटा या पात्राशी जोडून घेतले, हे पाहून समाधान वाटते. ही मालिका प्रामाणिकपणे बनवली आहे. जागतिक स्तरावर ट्रेंड होणे ही मोठी प्रेरणा आहे. प्रेक्षकांनी पाठवलेले संदेश मी वाचले आणि ते कायम सोबत ठेवणार आहे.’ तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अभिनेत्री दिया मिर्झा, अभिनेता विनीत कुमार सिंग आणि ताहीरा कश्यप यांनीही प्रतिक्रिया देत तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. अमृत राज गुप्ता दिग्दर्शित आणि अबंडंटिया एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली विक्रम मल्होत्रा व सुरेश त्रिवेदी निर्मित ‘दलदल’ ही वेबसीरिज विष धमीजाच्या ‘भेंडी बाजार’ या पुस्तकावर आधारित आहे. भूमीसोबतच समारा तिजोरी आणि आदित्य रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. कथानकाची पकड, वास्तववादी मांडणी आणि दमदार अभिनय यामुळे ‘दलदल’चा जागतिक बोलबाला होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.


समाजमाध्यमांवरील टीकेबाबत शनाया कपूरची भूमिका
हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून अभिनेत्री शनाया कपूर सतत सोशल मीडियावरील चर्चेत असते. अभिनयासोबतच तिच्या लूक, शरीरयष्टी आणि चेहऱ्याच्या रचनेवरून होणाऱ्या टीकेचा तिला अनेकदा सामना करावा लागतो. मात्र, या सगळ्याकडे ती कसे पाहते, याबद्दल शनायाने अलीकडेच मोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. शनाया म्हणाली की, मी सोशल मीडियावरील कमेंट्स नियमितपणे वाचते. कामासंदर्भात मिळणाऱ्या प्रतिक्रिया कठोर शब्दांत मांडल्या असल्या तरी मी सकारात्मक पद्धतीने त्यांना घेते. नृत्य, अभिनय किंवा सादरीकरणावर मिळणारी टीका मी एक फीडबॅक म्हणून स्वीकारते. प्रेक्षकांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी हे आवश्यक आहे असे मला वाटते. मात्र, वैयक्तिक रूपावर होणाऱ्या टीकेबाबत ती स्पष्ट भूमिका मांडते. शरीरयष्टी, चेहरा किंवा लूकवर केलेल्या टिप्पणी ती दुर्लक्ष करते. तरीही, अशा शब्दांचा कधी कधी मानसिक त्रास होऊ शकतो, हेही तिने मान्य केले. अशा वेळी ती तिची आई महीप कपूर यांच्याशी मन मोकळे करते. आईला ती केवळ पालक नव्हे, तर आपली जिवलग मैत्रीण मानते. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर शनाया नुकतीच ‘आँखों की गुस्ताखियाँ’ या चित्रपटात झळकली होती.


पान नंबर चारसाठी घेणे

हनुमानकाइंड-विशाल ददलानीचा नवा संगम!

भारतीय संगीतविश्वात विविध शैलींचा संगम नेहमीच लक्ष वेधून घेतो. रॉक संगीताचा ठसा उमटवणारा विशाल ददलानी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारा हिप-हॉप कलाकार हनुमानकाइंड एकत्र आल्याने संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. थम्स अपसाठी साकार करण्यात आलेले ‘टेस्ट द थंडर’ हे अँथम या दोन वेगळ्या संगीतप्रवाहांचा प्रभावी मिलाफ सादर करत आहे. ‘आज कुछ तूफानी करते हैं’ या टॅगलाइनवर आधारित हे गाणे तरुणाईतील ऊर्जा, आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती अधोरेखित करत आहे. हनुमानकाइंडचा इंग्रजी रॅप गाण्याला आधुनिक आणि जागतिक ओळख देत असून, विशाल ददलानीचा ताकदीचा आवाज सर्व वयोगटांतील श्रोत्यांशी नाते जोडणारा ठरला आहे. या गाण्याला सुशीन श्याम यांचे संगीत असून, वरुण ग्रोव्हर यांनी गीतलेखन केले आहे, तर दिग्दर्शनाची धुरा बिजॉय शेट्टी यांनी सांभाळली आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात हे अँथम सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, या गाण्यात भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांची उपस्थिती पाहायला मिळाली. थम्स अपच्या नव्या समर कॅम्पेनचा भाग असलेले ‘टेस्ट द थंडर’ सध्या संगीत आणि ब्रँड कम्युनिकेशनच्या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. वेगळी शैली आणि दमदार सादरीकरणामुळे हे गाणे तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup विजेत्या संघाला ICC कडून नाही, तर BCCI कडून मिळणार कोट्यवधींचं बक्षीस; घोषणाही झाली

Crime: संतापजनक! हातापायावर व्रण येईपर्यंत काठीचे १०५ फटके अन्...; शिक्षकाची १० वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

Viral Video: ५ मजल्यांवरून थेट खाली! मालेगाव महापालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले जीव… थरारक क्षण! व्हिडिओ व्हायरल

Rose Day 2026 Special: ग्लॅमरस लूक हवा आहे? ‘या’ मॅक्सी ड्रेसेस स्टाईल करा आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घ्या

"माझ्यावर टीका करून त्यांना झोप लागतेय.." सचिन पिळगावकर यांचे ट्रोलर्सना खडेबोल; "वैयक्तिक आयुष्यावर.."

SCROLL FOR NEXT