मुंबई

उल्हासनगरात खोदकामामुळे धुराळा

CD

कोट्यवधींचे रस्ते पुन्हा खोदले
धुराळ्यामुळे महापौर संतापल्या
उल्हासनगर, ता. ७ (बातमीदार) : शहरात ‘अमृत’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटार प्रकल्पाच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. वर्षभरापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते पुन्हा खोदले जात असल्याने शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या सावळ्या गोंधळामुळे संतप्त झालेल्या महापौर अश्विनी निकम यांनी थेट रस्त्यावर उतरून प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

४५० कोटींच्या अमृत योजनेसाठी शहरात ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिका निवडणुकीपूर्वी जे रस्ते गुळगुळीत करण्यात आले होते, तेच रस्ते आता खोदून काढले जात आहेत. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे. खोदकाम करताना धूळ रोखण्यासाठी पाणी मारणे किंवा इतर सुरक्षा उपाययोजनांकडे ठेकेदाराने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. हवेत पसरलेल्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे विकार आणि डोळ्यांचे त्रास जडत आहेत. अर्धवट खोदलेल्या रस्त्यांमुळे कल्याण-अंबरनाथ मार्गावर तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. ६८ कोटींच्या कल्याण-अंबरनाथ रस्ता पुनर्बांधणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.

अधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’
महापौर अश्विनी निकम यांनी शहर अभियंता नीलेश शिरसाटे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून कामाला गती देण्याचे आदेश दिले. ‘‘महापालिका अधिकाऱ्यांचा ठेकेदारावर अंकुश का नाही,’’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, कमलेश निकम, जमनू पुरस्वानी यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT