कल्याण-जुगाईवाडी एसटी बससेवा सुरू
सातारकर प्रवाशांची दीर्घप्रतीक्षित मागणी पूर्ण
कल्याण, ता. ७ (बातमीदार) : कल्याणमध्ये स्थायिक असलेल्या सातारकर रहिवाशांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आले आहे. कल्याण ते जुगाईवाडी (सातारा) या नवीन एसटी बससेवेची नुकतीच दिमाखात सुरुवात झाली आहे. या थेट सेवेमुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि सातारा परिसरात नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.
बससेवेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि परिवहनमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या लोकहिताच्या सेवेचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून करण्यात आले. प्रवाशांनी या सुविधेबद्दल आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत. कल्याण एसटी आगाराचे काम सध्या प्रगतिपथावर असल्याने ही बस तात्पुरती विठ्ठलवाडी आगारातून सुटणार आहे. विठ्ठलवाडी ते जुगाईवाडी बसचे दररोज रात्री ९ वाजता प्रस्थान होईल. जुगाईवाडी येथून दररोज सकाळी ६ वाजता परतीचा प्रवास सुरू करेल.
प्रवाशांना मोठा दिलासा
रात्रीच्या वेळी बसची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कामावरून घरी परतणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांना आपल्या प्रवासाचे नियोजन करणे सोपे झाले आहे. कल्याण आणि सातारा या दोन शहरांमधील दळणवळण सुलभ करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ‘‘सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना सदैव तत्पर असून, ही बससेवा सातारकरांच्या प्रवासातील कष्ट कमी करेल,’’ असा विश्वास महेश गायकवाड यांनी या वेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.