विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्याला अटक
ठाणे, ता ७ : भारतात प्रतिबंधित असलेल्या विदेशी सिगारेटची अवैध विक्री करण्यासाठी साठा करणाऱ्या एका तस्करास ठाणे पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले आहे. घोडबंदर रोडवरील एका पान शॉपवर ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथील ‘महाकाल जनरल स्टोअर अँड पान शॉप’मध्ये विदेशी सिगारेटचा अवैध साठा करून तो बेकायदेशीरपणे विकला जात असल्याची गोपनीय माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांच्या पथकाने ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संबंधित दुकानावर छापा टाकला. सुनील दानबहादूर सिंग (वय ४०) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी १० वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या विदेशी सिगारेटची ५५ पॅकबंद पाकिटे जप्त केली आहेत. आरोपीवर कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या अवैध सिगारेटचा पुरवठा साखळीचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.