दुचाकीवरील महिलेची सोनसाखळी हिसकावली
भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी शिताफीने हिसकावून नेल्याची घटना ठाणे-नाशिक महामार्गावर घडली आहे. पिंपळास गावाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, कोनगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण येथील रहिवासी असलेल्या आर्या आशीष पातकर (वय ३४) या गुरुवारी (ता. ५) रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या पतीसोबत दुचाकीने ठाण्याहून घराकडे जात होत्या. ठाणे-नाशिक वाहिनीवरून प्रवास करत असताना पिंपळास गावच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवरील दोन अज्ञातांनी त्यांच्याजवळून गाडी नेली. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने आर्या यांच्या गळ्यातील एक लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावली. काही कळायच्या आतच चोरट्यांनी नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात पलायन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पातकर दाम्पत्य भयभीत झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.