मुंबई

माजी विद्यार्थी विनायक घुडे यांचे व्याख्यान

CD

माजी विद्यार्थी विनायक घुडे यांचे व्याख्यान
मुरबाड, ता. ७ (वार्ताहर ) : मुरबाड तालुक्यातील शिवळे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मंडळ आणि शिवळे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एलआयसीमधील गुंतवणूक आणि एलआयसीमधील नोकरीच्या विविध संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
ठाणे विभागातील खोपोली शाखेचे विकास अधिकारी आणि शिवळे महाविद्यालयमधील माजी विद्यार्थी, १९९७ चे विद्यार्थी परिषदेचे जनरल सेक्रेटरी, शिवळे पुरस्कार प्राप्त, इंग्रजी विभागातील पहिल्या बॅचचे विद्यार्थी विनायक घुडे यांनी महाविद्यालयमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी एलआयसीमधील गुंतवणूक आणि एलआयसीमधील नोकरीच्या विविध संधी कशा आहेत. त्याचप्रमाणे एलआयसीचा विस्तार किती मोठा आहे. स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षा खूप महत्वाच्या आहेत. एलआयसीमध्ये विमा प्रतिनिधी ते एलआयसी अधिकारी परीक्षा कशा आहेत? ते पटवून दिले. जीवनात वेळ आणि नियोजन यांची जो सांगड घालेल, तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे मत विनायक घुडे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक उपप्राचार्य आणि माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. गीता पवार यांनी केले. सदर प्रसंगी प्राचार्य डॉ. बडगुजर आणि ग्रंथालय प्रमुख, फड उपस्थित होते. प्राध्यापक शेळके यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राध्यापक घुटे यांनी आभार प्रदर्शन केले. व्याख्यानास विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCला मिळाला नवा महापौर! भाजपच्या रितू तावडे यांचं शिक्षण काय? त्यांना पगार किती मिळणार?

Jalgaon Mayor Election : जळगावात महायुतीचा गुलाल! दीपमाला काळे महापौर तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

ZP Elections 2026 Voting Live Update : पूर्व दिल्लीतील मयूर विहार पॉकेट १ मेट्रो स्टेशनचे नाव बदलून 'श्री राम मंदिर मयूर विहार' असे केले

Ladki Bahin Yojana : धुळ्यातील 'लाडक्या बहिणीं'ना मोठा दिलासा! ५१ हजार अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच पडताळणी

T20 World Cup: सर्वाधिक धावा, शतकं अन् विकेट्स.... कोणाच्या नावावर कोणता विक्रम? पाहा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT