मुंबई

कारागृहात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

CD

कारागृहात जागतिक कर्करोगदिनानिमित्त जनजागृती
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : कर्करोगाबाबत जनजागृती वाढावी तसेच वेळेवर तपासणी व योग्य उपचारांचे महत्त्व अधोरेखित व्हावे, यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोगदिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेचे डॉ. मिलिंद पाटील व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे डॉ. नितीन गांधी यांनी कर्करोगाची लक्षणे, कारणे व प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. राजाराम हुलवान यांनी कर्करोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याची गरज सांगितली. कर्करोग हा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक व सामाजिक आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
वेळीच निदान, योग्य उपचार व मानसिक आधार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक वर्ग-२ विशाल बाळासाहेब बांदल, शिपाई रामहरी कुटे, सुभेदार, सुनील जाधव, हवालदार, अजय जावळे, सतिश जुंबळे, क्रांती कदम इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCला मिळाला नवा महापौर! भाजपच्या रितू तावडे यांचं शिक्षण काय? त्यांना पगार किती मिळणार?

Jalgaon Mayor Election : जळगावात महायुतीचा गुलाल! दीपमाला काळे महापौर तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

ZP Elections 2026 Voting Live Update : मतदार आणि मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यात वाद

Ladki Bahin Yojana : धुळ्यातील 'लाडक्या बहिणीं'ना मोठा दिलासा! ५१ हजार अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच पडताळणी

T20 World Cup: सर्वाधिक धावा, शतकं अन् विकेट्स.... कोणाच्या नावावर कोणता विक्रम? पाहा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT