मुंबई

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

CD

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
मुलुंड, ता. ७ (बातमीदार) : भांडुप पश्चिमेतील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये सांडपाण्याची मिसळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून, त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सुरू असलेले पाइपलाइनचे काम तातडीने आणि गतीने पूर्ण करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११४च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी ‘एस’ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. मुंबईसारख्या महानगरात नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची नाराजी राजोल पाटील यांनी व्यक्त केली. “नागरिक वेळेवर कर भरत असतानाही मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागत आहे. भांडुप परिसरातील विविध भागांतून दूषित पाणीपुरवठ्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. प्रत्यक्ष पाहणीत समस्या गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, टेंभीपाडा परिसरात मोठ्या पाइपलाइन्सच्या दुरुस्तीदरम्यान गटाराचे पाणी पिण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळल्याची शक्यता व्यक्त होत आहे. उत्कर्ष नगर, साई हिल, रमाबाई नगर, नारदास नगर आणि शिवाजी नगर या भागांतही दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते विवेक सावंत यांनी इशारा देताना सांगितले की, “प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.”
माता रमाबाई नगरमधील जुने व जीर्ण पाइपलाइन्स सांडपाण्याच्या नाल्यातून जात असल्याने पाणी दूषित होत असून, परिसरात दुर्गंधी व डासांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका राजोल पाटील, माजी नगरसेवक रमेश कोरगावकर आणि शाखाप्रमुख राजेश कदम यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. या वेळी सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांनी काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kota Building Collapse : कोटामध्ये ३ मजली इमारत कोसळली, विद्यार्थासह २ जणांचा मृत्यू, १३ जणांना वाचवण्याचा यश, बचावकार्य सुरुच

T20 World Cup: विजयाचा 'रिमोट कंट्रोल' गोलंदाजांच्या हातात! इरफान पठाणने उलगडले टी-२० मधील गोलंदाजीचे गुपित

Propose Day 2026 Special Recipe: प्रपोज डे ला बनवा खास शाही तुकडा, चव अन् प्रेम दोन्ही होईल दुप्पट, लगेच नोट करा रेसिपी

Sant Gajanan Maharaj : संतनगरीत आज 'श्रीं'चा १४८ वा प्रगटदिन उत्सव; दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार मंदिर; शेगावात भक्तांची मांदियाळी

T20 World Cup: आठवणीत रमताना: २००७ ची फायनल, विंडीजचा धमाका ते २०२४ मधील विजेतेपद...

SCROLL FOR NEXT