मुंबई

ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन

CD

बी.एन.एन. महाविद्यालयाच्या ग्रंथालय इमारतीचे भूमिपूजन

भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : ग्रंथालय म्हणजे केवळ वाचनाचे केंद्र नसून संवाद, चिंतन आणि विचारप्रक्रिया समृद्ध करणारे केंद्र आहे. अशा ग्रंथालयाचा लाभ निश्चितच विद्यार्थ्यांना होईल. बी.एन.एन. महाविद्यालयाचे नवीन ग्रंथालय भिवंडी शहरातील सर्वात मोठे ग्रंथालय ठरेल, असे प्रतिपादन भिवंडी महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी केले. ते पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित बी.एन.एन. महाविद्यालयाच्या नवीन ग्रंथालय इमारतीच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात संस्थेचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, पदाधिकारी श्रीराम भोईर, आर. एन. पिंजारी, प्रभारी प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर, सहाय्यक उपायुक्त सुरेंद्र भोईर, मंदार लेले, दुर्राज कामणकर, जियाद मोमिन, उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, डॉ. निनाद जाधव, डॉ. सुरेश भदरगे, डॉ. कुलदीप राठौड, प्रबंधक नरेश शिरसाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम. ओ. महाले, पर्यवेक्षक श्रीकांत पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अजिंक्य कांबळे, पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस, मातोश्री उषाताई जाधव मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे विजय वंजारे तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मयोगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या धस यांनी केले, तर आभार प्रभारी प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

धक्कादायक! यवतमाळमधील शाळेत पाकिस्तानी लष्कराच्या स्फूर्तीगीताचं गायन, भाजप नेत्यानं दाखल केली तक्रार; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT