जनगणनेच्या तयारीला वेग
उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : देशाच्या सामाजिक-आर्थिक आराखड्याला आकार देणारी जनगणना २०२७ आता अंतिम तयारीच्या टप्प्यात पोहोचली असून, त्या दृष्टीने उल्हासनगरमध्ये प्रशासनाने कंबर कसली आहे. घरागणिक अचूक माहिती संकलनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या हाउसहोल्ड ब्लॉक फॉर्मेशन प्रक्रियेच्या सखोल प्रशिक्षणाला उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भारत सरकारच्या जनगणना २०२७ उपक्रमाच्या अनुषंगाने हाउसहोल्ड ब्लॉक फॉर्मेशन संदर्भात उल्हासनगर येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनगणना कार्यन्वित संचालनालयाचे उप महानिबंधक (सी अँड टी) यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये महापालिका मुख्यालयात हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षण सत्रात जनगणना विभागाचे सहाय्यक संचालक प्रवीण भगत, संख्यिकी अन्वेषक ग्रेड-१ चे अरुण साळगावकर यांनी उपस्थित महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. हाउसहोल्ड ब्लॉक फॉर्मेशनची संकल्पना, त्याची अंमलबजावणी, अचूक सीमांकन तसेच प्रत्यक्ष काम करताना घ्यावयाच्या दक्षता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षण कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस, उपआयुक्त डॉ. दिपाली चौगले, स्नेहा करपे, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, सलोनी निवकर यांच्यासह जनगणना कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनगणना २०२७ यशस्वीपणे राबविण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय तयारी, तांत्रिक कौशल्य आणि समन्वय याची पायाभरणी या प्रशिक्षणातून झाली आहे.
जनगणना दोन टप्प्यात
जनगणनेसाठी ३१ डिसेंबर २०२५ ला सर्व प्रशासकीय सीमारेषा ‘फ्रिझ’ करण्यात आलेल्या असून, या सीमारेषा जनगणना २०२७ साठी अंतिम मानल्या जाणार आहेत. यानंतर होणारी जनगणना प्रक्रिया १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून, ती दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात लोकगणना प्रक्रिया पार पडणार आहे.
फोटो - १७३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.