खालापुरात पंचायत समितीवर कमळ फुलणार?
खालापूर, ता. ८ (बातमीदार) ः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी खालापूर तालुक्यात मात्र राजकीय चित्र काहीसे वेगळे दिसण्याची चिन्हे आहेत. २०१७ मध्ये जिंकलेल्या तीन जागा कायम राखताना राष्ट्रवादीला या वेळी मोठी कसरत करावी लागणार आहे, तर दुसरीकडे खालापुरात भाजपला इतिहास घडवण्याची संधी असून, प्रथमच पंचायत समितीवर कमळ फुलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेसाठी ११ आणि पंचायत समितीसाठी १७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. शनिवारी मतदारांनी उस्फूर्तपणे हजेरी लावल्याने खालापुरात ७५.९७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान आत्करगाव जिल्हा परिषद गटात ८०.१८ झाले. पंचायत समितीच्या जागांवर भाजपने प्रथमच निवडणूक लढवली आहे. यात चौक गटात दोन, वासांबे गटात दोन आणि सावरोली गटातील वाशिवली गणात एक असे पाच उमेदवार भाजपने उभे केले आहेत. वासांबे, चौक जिल्हा परिषद गटात पूर्ण ताकद लावल्याने या ठिकाणी भाजपच्या पारड्यात मतदारांचा कौल जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पहिल्यांदाच खालापूर पंचायत समितीवर कमळ फुलण्याची शक्यता असून, भाजपने सभापतीपदावर दावा ठोकण्याची तयारी केली आहे.
तर, सावरोली गटात शिंदे गटाच्या आमदार महेंद्र थोरवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष बैलमारे यांच्यावर शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.