शीव स्थानकातील स्वयंचलित जिने सतत नादुरुस्त; प्रवाशांचा संताप
धारावी, ता. ८ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या शीव स्थानकातील फलाट क्रमांक २ व ३ वर कुर्ला दिशेला असलेल्या पादचारी पुलावर बसविण्यात आलेले स्वयंचलित जिने वारंवार नादुरुस्त होत असून, अनेकदा दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी हे स्वयंचलित जिने उभारण्यात आले. धारावी परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच कल्याण दिशेला कामानिमित्त प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांसाठी हे जिने मोठा दिलासा ठरले होते. विशेषतः रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान विद्यार्थी, अपंग व गरोदर महिलांसाठी हा जिना वरदान मानला जात होता.
सध्या स्थानकासमोरील वाहतूक पूल बंद असल्याने धारावी व सायनकडे जाणारे सर्व पर्यायी मार्ग प्रशासनाने बंद केले आहेत. परिणामी, स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या एकमेव पादचारी जिन्यावर सतत गर्दी होत आहे. गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवासी स्वयंचलित जिन्याचा वापर करण्यास प्राधान्य देतात. मात्र, गरजेच्या वेळी हे जिने बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
“मी दररोज शीव स्थानकातून प्रवास करतो. मी ज्येष्ठ नागरिक असून, मला शारीरिक व्याधी आहेत. त्यामुळे स्थानकातून बाहेर पडणे अनेकदा कठीण होते,” अशी व्यथा राम कोकणे या ज्येष्ठ प्रवाशाने व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर स्वयंचलित जिन्यांची तातडीने दुरुस्ती करून ते नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.