मुंबई

स्वस्त घरांच्या नावाखाली लाखोंचा गंडा

CD

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून आणि कायदेशीर कागदपत्रांचा बनाव रचून १५ हून अधिक नागरिकांना तब्बल ८२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार पनवेलमधील हरिग्राम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी विकसक विजय किशोरीलाल गुप्ता (उर्फ चुन्नीलाल) आणि जमीनमालक वसंत शिवा वाघे (उर्फ वाघमारे) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

२०२१ मध्ये विजय गुप्ता आणि वसंत वाघे यांनी हरिग्राममधील विजय नगर येथे हिंदुस्थान होम्स या नावाने निवासी चाळीचे बांधकाम सुरू केले होते. या चाळीतील घरे स्वस्तात विक्री करत असल्याची जाहिरातबाजी करत दोघांनीही हा प्रकल्प कायदेशीर असल्याचे भासवले होते. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी सातबाराचे उतारे आणि साठेकरार (नोटरी)देखील करून दिले. सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे यांच्यासह अनेकांनी प्रत्येकी १० ते १२ लाख रुपये दोघांना घरासाठी दिले होते.

ज्या जमिनीवर चाळी बांधल्या होत्या, ती जमीन ही आदिवासी मालकीची असल्याचे व नियमानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अशा जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही. ही बाब माहिती असतानाही बिल्डर आणि जमीन मालकाने संगनमत करून ग्राहकांना अंधारात ठेवले. तसेच बनावट व्यवहारांच्या जोरावर लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दीपक शिंदे यांनी खांदेश्वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

जमीनमालकाकडूनच तक्रार
खरेदीदारांकडून पूर्ण पैसे उकळल्यानंतर, तसेच घरांचा ताबा दिल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये वसंत वाघे यानेच हे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार नैना प्रशासनाकडे केली. या तक्रारीनंतर नैना प्रशासनाने कारवाई करत ही चाळ जमीनदोस्त केली. हक्काचे घर डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याने गुंतवणूकदारांवर संकट कोसळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: सत्तेची गणितं उलथवणार का हा निकाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल

Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी’च्या पंधराव्या सीझनची थरारक झलक, रोहित शेट्टी पुन्हा होस्ट

ZP Election Result: ग्रामीणचा शिलेदार कोण? आज मतमोजणी; ५०२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

MPSC Recruitment Update : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 2 लाख 17 हजारांहून अधिक पदांची होणार भरती? परीक्षा व भरती प्रक्रियेतही बदलांची शक्यता

Kolhapur ZP : पहिला गुलाल दुपारी १२ वाजता! जिल्हा परिषद निवडणुकीचा थरार शिगेला २५० टेबलांवर मतमोजणी, १८८ फेऱ्या

SCROLL FOR NEXT